JOIN US
मराठी बातम्या / मनी / बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? 10 टक्क्यांहून कमी व्याजदराने कोणत्या बँका कर्ज देतात, चेक करा

बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? 10 टक्क्यांहून कमी व्याजदराने कोणत्या बँका कर्ज देतात, चेक करा

बाईक खरेदीसाठी विविध बँका आकर्षक व्याजदर देऊन ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन देतात. सध्या बाईक लोनसाठी कोणत्या बँक किती व्याजदर आकारतात यावर एक नजर टाकूया.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 एप्रिल : बाईक खरेदी करणे फायनान्स सुविधांमुळे (Finance Service) सोपं होतं. Bankbazaar.com च्या माहितीनुसार, 1 लाख रुपयांच्या बाइकसाठी 3 वर्षांचे मुदत कर्ज 6.85 टक्के प्रारंभिक व्याजावर उपलब्ध आहे. त्यामुळे बाईक घरेदी करताना जास्त अडचणी येत नाहीत. विविध बँका आकर्षक व्याजदर (Bank Interest Rate) देऊन ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन देतात. सध्या बाईक लोनसाठी कोणत्या बँक किती व्याजदर आकारतात यावर एक नजर टाकूया. बँक ऑफ इंडिया : सरकारी मालकीची बँक ऑफ इंडिया ही या विभागातील सर्वात स्वस्त कर्ज देणारी बँक आहे. SBI दुचाकी वाहनांसाठी 6,85 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. या व्याजदरावर 3 वर्षांच्या कालावधीसाठी 1 लाख रुपयांच्या कर्जावर 3,081 रुपयांची EMI भरावा लागेल. सेंट्रल बँक ऑफ इंडिया : दुसरी सरकारी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 7.25 टक्के व्याज दरासह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये तुम्हाला 3,099 रुपयांचा EMI भरावा लागेल. EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा जम्मू आणि काश्मीर बँक: ही बँक 1 लाख रुपयांच्या कर्जावर 3 वर्षांच्या कालावधीसाठी 8.45 टक्के व्याज आकारते. पंजाब नॅशनल बँक: स्वस्त कर्जदारांच्या या यादीत, सरकारी बँकांचे वर्चस्व आहे. PNB 1 लाख रुपयांपर्यंतच्या बाईक कर्जासाठी 8.65 टक्के व्याजदर ऑफर करते. पंजाब आणि सिंध बँक : ही सरकारी बँक दुचाकी वाहनांसाठी 8.8 टक्के दराने कर्ज देते. यासाठी तुम्हाला 3171 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अॅक्सिस बँक आणि कॅनरा बँक अॅक्सिस बँक या यादीतील पहिली खाजगी बँक अॅक्सिस बँक आहे, जी दुचाकी वाहनांसाठी 9 टक्के दराने कर्ज देते. सरकारी मालकीची कॅनरा बँक देखील त्याच व्याजदराने कर्ज देते. यासाठी तुम्हाला 3,180 रुपये EMI भरावा लागेल. SBI आणि Axis बँकेनंतर ‘या’ बँकेने व्याजदर वाढवले; ग्राहकांना किती टक्के जास्त व्याज भरावं लागणार? युनियन बँक ऑफ इंडिया: ही सरकारी मालकीची बँक सुमारे 10 टक्के व्याज दर देते. यासाठी तुम्हाला तीन वर्षांसाठी 3222 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. या डेटामध्ये BSE वर सूचीबद्ध सरकारी आणि खाजगी बँकांच्या दुचाकी कर्जाचा विचार करण्यात आला होता. यासह परदेशी आणि लघु वित्त बँका वेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, ज्या बँकांचा डेटा त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध नाही, त्यांचाही विचार करण्यात आलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या