मुंबई, 26 सप्टेंबर : सध्या आर्थिक गुन्हे वाढलेत. म्हणूनच व्यावसायिक बँका, पेमेंट्स बँका आणि मायक्रोफायनान्स इन्स्टिट्युशन्स काळजी घेतायत. ग्राहकांना अशा गुन्ह्यांना तोंड द्यावं लागू नये, म्हणून सावधानतेचे उपाय सुचवतायत. देशाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क केलंय. SBI नं ट्वीट करून ऑनलाइन फ्राॅडपासून वाचण्यासाठी ग्राहकांना अलर्ट केलंय. बँकेनं सांगितलंय की ग्राहकांनी फेक सोशल मीडिया अकाउंटपासून सावध राहावं. व्हेरिफाइड सोशल मीडिया अकाउंट फाॅलो करा SBI नं ग्राहकांना फेक सोशल अकाउंटपासून सावध राहायला सांगितलंय. बँकेनं सांगितलं की ग्राहकांनी फक्त सोशल मीडिया अकाउंटच फाॅलो करावं. बँकेच्या नावाचं अनऑथोराइज्ड सोशल मीडिया अकाउंट फाॅलो करणं नुकसानीचं होऊ शकतं. बँकेनं आपल्या ट्वीटमध्ये सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मसाठी SBIच्या व्हेरिफाइड आणि ऑफिशियल हँडलबद्दल सांगितलंय. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झाला बदल, जाणून घ्या नवे दर फेक अकाउंटपासून सावध SBI नं ट्वीटमध्ये सांगितलंय की, सोशल मीडियावरच्या फेक अकाउंटवर पैसे आणि वेळ खर्च करू नका. बँकेनं आपल्या ट्वीटमध्ये सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मसाठी SBI च्या व्हेरिफाइड अकाउंटबद्दल सांगितलंय. 30 सप्टेंबरच्या आत ‘असं’ लिंक करा पॅन आणि आधार कार्ड, नाही तर होईल मोठं नुकसान फेसबुक: @StateBankOfIndia इंस्टाग्राम: @theofficialsbi ट्विटर: @TheOfficialSBi लिंक्डइन: State Bank of India (SBI) गुगल+: State Bank of India यूट्यूब: State Bank of India क्वोरा: State Bank of India (SBI) पिनट्रेस्ट: State Bank Of India इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं दिला सावधानतेचा इशारा, ‘हा’ मेसेज आहे खोटा काही घोटाळा झाला तर इथे करा फोन SBI नं सांगितलंय की ग्राहकांनी सतर्क तर राहावंच, पण बँकेनं 2 हेल्पलाइन नंबर्सही दिलेत. 1800112211 आणि 18004253800. ते टोल फ्री आहेत. काही घोटाळा झालाच तर ग्राहकांनी यावर फोन करावा. पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO