मुंबई, 18 एप्रिल : मुंबईसह देशभरातील बँक ग्राहकांसाठी (Bank Customers) एक मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारपासून म्हणजेच आजपासून मुंबईसह देशभरातील बँकांच्या कामकाजाच्या (Bank Opening Time) वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. सोमवारपासून बँक उघडण्याची वेळ सकाळी 9 वाजताची झाली आहे. यामुळे ग्राहकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तास मिळेल. मात्र बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच पूर्वीच्या वेळेतच बँका बंद होतील. कोरोना साथीमुळे (Coronavirus) दिवसभरात बँका उघडण्याचे तास कमी करण्यात आले होते. जे आता पुन्हा सामान्य करण्यात आले आहे. ही नवीन सुविधा 18 एप्रिल 2022 पासून म्हणजेच आजपासून लागू झाली आहे. RBI ने बँकेच्या ग्राहकांसाठी ATM संबंधीही एक नवीन घोषणा केली आहे. झिरो रिस्कवर ओपन करा हे सुरक्षित अकाउंट, दर महिन्याला मिळतील 4950 रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या म्हणण्यानुसार, सोमवार म्हणजेच 18 एप्रिलपासून बँका उघडण्याच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. आता बँका सकाळी 9 वाजता उघडतील, तर बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा एक तास अतिरिक्त वेळ मिळणार आहे. ज्याद्वारे ग्राहक बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियासह देशात सात सरकारी बँका आहेत, त्याशिवाय देशात 20 हून अधिक खाजगी बँका आहेत. ज्यांना हा नियम लागू होईल. रिटायरमेंटनंतर दर महिना मिळेल 22000 रुपये पेन्शन, काय आहे सरकारी योजना कार्डलेस एटीएममधून लवकरच व्यवहार करण्याची सुविधा आता लवकरच एटीएममधून कार्डलेस व्यवहाराची (Cardless Transaction) सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी बँकांमध्ये सुरू आहे. याद्वारे ग्राहकांना UPI द्वारे बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे (ATM Withdrawal) काढता येणार आहेत. कार्डलेस म्हणजेच कार्ड न वापरता व्यवहारासाठी RBI हे करणार आहे. यासाठी सर्व बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा UPI द्वारे दिली जाईल. एटीएमशी संबंधित फसवणुकीत घट होणार यामुळे एटीएमशी संबंधित फसवणूक कमी होईल, असा विश्वास आरबीआयला आहे. कार्डलेस ट्रान्झॅक्शन्समुळे व्यवहार सोपे होतील आणि कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे कार्ड क्लोनिंग, कार्ड चोरी यासह इतर अनेक फसवणूक रोखण्यात मदत होईल.