नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी: या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 22 मध्ये 13 दिवस सरकारी आणि खासगी बॅंकांमध्ये कोणतंही कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank of India) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार (Bank Holiday List in February 2022), फेब्रुवारी महिन्यात 13 दिवस सुट्ट्यांमुळे बॅंका बंद राहणार आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये कामगार संघटनांनी दोन दिवस संपाचीही हाक दिली आहे. फेब्रुवारीमध्ये, बँकांच्या एकूण 13 दिवसांच्या सुट्ट्यांपैकी चार सुट्ट्या या रविवारच्या आहेत. यातील काही सुट्ट्या या जोडून आलेल्या आहेत. ‘आरबीआय’च्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या सुट्टयांच्या यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांसाठी आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांना एकाच वेळी लागू होणार नाहीत. तसेच ‘आरबीआय’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद असतात. ज्या ग्राहकांना कामासाठी प्रत्यक्ष बॅंकेत जावं लागतं, अशा ग्राहकांना बँकेचं कामकाज बंद राहिल्यास सर्वाधिक फटका बसतो. तथापि, वीकेंडला ऑनलाइन बँकिंग सेवा (Online Banking Service) सुरू राहत असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळतो. ‘आरबीआय’ने अलीकडेच लागू केलेल्या नवीन नियमांमुळे एनईएफटी (NEFT) आणि अन्य पैसे ट्रान्सफर करण्याची ऑनलाइन चॅनेल सुट्टीच्या दिवशीही सुरू राहत असल्याने ग्राहकांना याचा फायदा होतो. हे वाचा- Budget 2022 | देशात तुटीचाच अर्थसंकल्प का होतो सादर? याचे फायदे तोटे काय? दोन दिवस बॅंकांचा संप बॅंक कर्मचाऱ्यांनी 23 आणि 24 फेब्रुवारीला संप जाहीर केला आहे. सेंट्रल ट्रेड युनियन (CTU) आणि ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनसह (AIBEA) अन्य संघटनांनी संयुक्तपणे या संपाची घोषणा केली आहे. यामध्ये देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बॅंकांचा समावेश असेल. त्यामुळे संप झाल्यास 23 ते 27 फेब्रुवारी असे चार दिवस बॅंकांचे कामकाज होणार नाही. कारण 23 आणि 24 फेब्रुवारीला संघटना संपावर गेल्यास फेब्रुवारीत 23 ते 27 म्हणजे पाच दिवसांपैकी चार दिवस बॅंकांमधील कामकाज ठप्प होणार आहे. 23 आणि 24 फेब्रुवारीला संप आणि 26 आणि 27 ला अनुक्रमे चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बॅंकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. फेब्रुवारी महिन्यात ‘या’ तारखांना असेल सुट्टी 5 फेब्रुवारी: सरस्वती पूजन/वसंत पंचमी (हरियाणा, ओडिशा, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये सुट्टी) 6 फेब्रुवारी: रविवार 12 फेब्रुवारी: महिन्यातील दुसरा शनिवार 13 फेब्रुवारी: रविवार 15 फेब्रुवारी: हजरत अली जयंती/लुई-नगाई-नी (उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये बॅंका बंद) 16 फेब्रुवारी: गुरू रविदास जयंती (चंडीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये बॅंका बंद) हे वाचा- या’ तारखेला लाँच होणार वेदांत फॅशन कंपनीचा आयपीओ, कमाईची आहे संधी 18 फेब्रुवारी: डोलयात्रा (पश्चिम बंगालमध्ये बॅंका बंद) 19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (महाराष्ट्रात बॅंका बंद) 20 फेब्रुवारी: रविवार 23 फेब्रुवारी: बॅंकांचा संप 24 फेब्रुवारी: बॅंकांचा संप 26 फेब्रुवारी: महिन्यातील चौथा शनिवार 27 फेब्रुवारी: रविवार