JOIN US
मराठी बातम्या / मनी / Bank Holidays : तुमच्या कामाची बातमी! एप्रिल महिन्यात १५ दिवस बंद राहणार बँक

Bank Holidays : तुमच्या कामाची बातमी! एप्रिल महिन्यात १५ दिवस बंद राहणार बँक

तुमच्या शहरात किंवा जिल्ह्यात कोणत्या दिवशी बँक बंद असेल याची लिस्ट आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : RBI दर महिन्याला बँकेच्या सुट्ट्यांचं कॅलेंडर जाहीर करते. यामध्ये शनिवार रविवार सोडून इतरही सुट्ट्या असतात. काही सुट्ट्या देशातील सगळ्या बँकांना लागू होतात. तर काही सुट्ट्या ह्या स्थानिक म्हणजे राज्यानुसार तिथल्या शाखांना लागू होतात. तुमच्या शहरात किंवा जिल्ह्यात कोणत्या दिवशी बँक बंद असेल याची लिस्ट आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. एप्रिल महिन्यात तब्बल 15 दिवस बँक बंद राहणार आहे. तुम्ही जर बँकेची महत्त्वाची कामं करायचा प्लॅन करत असाल तर या सुट्ट्या पाहून तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करू शकता. सलग सुट्ट्यांमुळे ATM मध्येही पैशांची कमतरता जाणवू शकते.

बँका बुडण्याचं प्रमाण वाढतंय तुमच्या कष्टाचे पैसे बँकेत किती सुरक्षित?

एप्रिल महिन्यात येणाऱ्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी तुम्ही पाहिलीच पाहिजे. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार एप्रिल महिन्यात खासगी आणि सरकारी बँका एकूण १५ दिवस बंद राहणार आहेत. 15 दिवसांच्या सुट्यांमध्ये काही स्थानिक सुट्ट्या आहेत, मात्र काही दिवस संपूर्ण भारतात बँका बंद राहतील. या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलीये. ज्यामध्ये राज्यांनुसार विविध सण आणि सुट्ट्यांची संपूर्ण माहिती देण्यात आलीये. 1 एप्रिल 2023 - अकाउंट क्लोजिंगमुळे बँका बंद असतात. 2 एप्रिल: रविवार 4 एप्रिल 2023 - महावीर जयंती 5 एप्रिल 2023 - बाबू जगजीवन राम जन्मदिवस 7 एप्रिल - गुड फ्रायडे 8 एप्रिल - दुसरा शनिवार 9 एप्रिल - रविवार 14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी

भारतातील या 3 बँका सर्वात जास्त सुरक्षित, कधीच बुडणार नाहीत पैसे

संबंधित बातम्या

15 एप्रिल - बोहाग, बिहू, विशु 16 एप्रिल - रविवार 18 एप्रिल 2023 - शब-ए-कदर 21 एप्रिल 2023 - ईद-उल-फित्र (रमजान ईद) / गरिया पूजा / जुमात-उल-विदा 22 एप्रिल 2023 - रमजान ईद (ईद-उल-फित्र), चौथा शनिवार 23 एप्रिल - रविवार 30 एप्रिल - रविवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या