JOIN US
मराठी बातम्या / मनी / Auto News: उभ्या गाडीत AC लावला तर 1 तासात किती इंधन लागतं? मायलेजवर परिणाम होतो का?

Auto News: उभ्या गाडीत AC लावला तर 1 तासात किती इंधन लागतं? मायलेजवर परिणाम होतो का?

कारमध्ये एसी चालू ठेवून गाडी चालवल्याने इंधनाचा वापर वाढतो हे जवळपास प्रत्येक ड्रायव्हरला माहीत आहे. एसी इंजिनला जोडलेला असतो आणि इंजिन चालल्याशिवाय एसी चालणार नाही. पण उभ्या कारमध्ये इंजीन ऑन करुन एसी लावल्याने काय होतं?

जाहिरात

कार एसी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Car AC Facts: उन्हाळ्यात एसीशिवाय गाडी चालवणे अशक्य असतं. कारण तापलेल्या गाडीमुळे अंगाची लाहीलाही होते. गाडीचा एसी बिघडला तर लोक गाडी घेण्याऐवजी चालणे पसंत करतात. कारण उन्हाळ्यात एसी अत्यंत महत्त्वाचा असतो. पण एसी देखील इंधन वापरते. एसी आणि इंजिन एकमेकांशी जोडलेले आहेत, त्यामुळे एसी चालू ठेवून कार चालवल्याने इंजिनवरील भार वाढतो. एसी हा इंजिनमध्ये असलेल्या पेट्रोल किंवा डिझेलवर चालतो. पण इंजिन सुरू ठेवून पार्क केलेल्या कारमध्ये एसी चालवला, तर किती इंधन लागतं? हे खूप कमी लोकांना माहिती असेल. चला तर मग जाणून घेऊया. एसीचा कारच्या मायलेजवर किती परिणाम होतो.

कार एसी कसे काम करते

कारमधील एसी ही इंजिन चालू झाल्यावरच चालते. कारण एसीच्या कंप्रेसरला जोडलेला बेल्ट इंजिन सुरू झाल्यावरच फिरतो. या प्रक्रियेत इंजिन टाकीतून इंधन वापरते. इंजिन चालू असताना, कारचा एसी सामान्य एसीप्रमाणे काम करतो. एसीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, कारमध्ये विविध मोडसह रीक्रिक्युलेशन बटण असतात.

Automatic Cars : ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार! कमी पैशांत मिळतील जबरदस्त फीचर्स

कारच्या मायलेजवर किती परिणाम होतो

तुम्ही एसी चालू ठेवून कार चालवली तर मायलेज 5-6 टक्क्यांनी घसरते. पण अनेक रिपोर्ट्समध्ये दिसलंय की, चालत्या कारमध्ये एसी सुरू ठेवल्याने मायलेजवर परिणाम होत नाही. हायवेवर गाडी चालवली जात असेल आणि एसी सुरू असेल तर मायलेजवर फारसा परिणाम होणार नाही. पण गाडीच्या खिडक्या उघड्या असतील तर मायलेज कमी असू शकतो. दुसरीकडे, जर कार सामान्य स्थितीत चालविली गेली, तर एसीचा वापर केल्यास मायलेज 5-7 टक्क्यांनी कमी होऊ शकते. पण मायलेज इतके कमी होणार नाही की तुम्हाला एसी बंद ठेवावा लागेल.

पूर असो वा वादळ, ही पॉलिसी करेल तुमच्या कारची सुरक्षा; अवश्य घ्या जाणून

उभ्या कारमध्ये एसी चालवल्यास काय होतं?

एका रिसर्चनुसार, 1000 सीसी कारमध्ये 1 तास एसी चालवल्यास 0.6 लीटर पेट्रोल वापरलं जातं. दुसरीकडे गाडी उभी केली तर पेट्रोलचा वापर दुपटीने वाढतो. उभ्या असलेल्या कारमध्ये एसी चालवल्याने 1 तासात 1.2 लिटर पेट्रोल जळते. सामान्य हॅचबॅक कारमध्ये पेट्रोलचा वापर 1 ते 1.2 लिटरपर्यंत असू शकतो. मात्र हे सर्व कारचे इंजिन किती फ्लूय एफिसिएंट आहे यावर अवलंबून आहे. यासोबतच कारच्या इंजिनची स्थिती, कारची स्थिती, एसीची सेटिंग आणि बाहेरचे हवामान यावरही एसी चालू असताना किती इंधन लागेल हे ठरतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या