JOIN US
मराठी बातम्या / मनी / 'ही' आहेत भारतातली महागडी शहरं, मुंबईचा कितवा नंबर?

'ही' आहेत भारतातली महागडी शहरं, मुंबईचा कितवा नंबर?

Costly Cities, Mumbai, New Delhi - आशियातल्या टाॅप 20 महागड्या शहरांची यादी प्रसिद्ध झालीय

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जून : मुंबई शहराचे गोडवे अनेक जण गातात. मुंबईवर बरीच गाणीही तयार झालीयत. इथे कुणी उपाशी राहत नाही, ह शहर कधी झोपत नाही असंही म्हणतात. पण अजून या शहराची एक खासीयत समोर आलीय. मुंबई फक्त भारतातच नाही तर अख्ख्या आशियामध्ये सर्वात महागडं शहर आहे. आशियातल्या टाॅप 20 महाग शहरांच्या यादीत मुंबईचं नाव आहे. या शहरात घराच्या किमती जगात सर्वात जास्त आहेत. ग्लोबल कन्सल्टिंग कंपनी मर्सरच्या सर्वेनुसार आशियातल्या टाॅप 20 महाग शहरांमध्ये मुंबईचं स्थान 12वं आहे. मुंबई परदेशी लोकांसाठी सर्वात महाग शहर आहे.तर कोलकाता सर्वात स्वस्त शहर आहे. देशातल्या इतर शहरांचं स्थान भारतीय शहरांमध्ये मुंबईनंतर नवी दिल्ली ( 118 ), चेन्नई ( 154 ) या शहरांचा नंबर आहे. नवी दिल्ली आणि चेन्नई गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 ते 15 पाॅइंट खाली येऊन स्वस्त झालंय. बंगळुरू ( 179 ) आणि कोलकाता ( 189 ) ही दोन शहरं भारतातली सर्वात स्वस्त शहरं आहेत. EPFO मध्ये 2 हजाराहून जास्त जागांवर नोकरीची संधी, ‘असा’ करा अर्ज रेल्वेची खास भेट, ‘या’ पदांवर 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित या सर्वेत जगातल्या पाच महाद्विपांच्या 209 शहरांचा समावेश आहे. त्यात वेगवेगळ्या 200 गोष्टींची तुलना केलीय. त्यात राहण्याचा खर्च, प्रवास, खाणं, कपडे, घर चालवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि मनोरंजन या गोष्टी आहेत. सर्वेनुसार चलनात होणार चढउतार, महागाईचा दर, डाॅलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होणं यामुळे ही घसरण झालीय. FSSAI नवा नियम, जाडेपणा वाढवणाऱ्या पदार्थांवर आता कडक निर्बंध हाँगकाँग सर्वात महाग सर्वेमध्ये 209 शहरांचा अभ्यास केला गेला. यात हाँगकाँग सर्वात महाग शहर ठरलंय. त्यानंतर तोक्यो, सिंगापूर आणि सियोल यांचं स्थान आहे. याशिवाय ज्युरिख, शांघाय, अश्गाबॅट, बीजिंग, न्यूयाॅर्क आणि शेंजन यांचा समावेश होतो. स्वस्त शहरांमध्ये ट्युनिस, ताश्कंद आणि कराची यांचा नंबर लागतो. VIDEO: घाटकोपरमध्ये भिंत कोसळली, कारचं मोठं नुकसान

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या