गुडन्यूज! 'या' रेशनकार्डधारकांना मिळणार मोफत 21 किलो गहू अन् 14 किलो तांदूळ, पाहा डिटेल्स
मुंबई, 19 नोव्हेंबर: समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागास गटासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. अंत्योदय योजना त्याचाच एक भाग आहे. आता अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी आणखी एक योजना जाहीर करण्यात आली आहे. अंत्योदय रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. त्यासोबतच तेल आणि मीठही मोफत मिळणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत अन्नधान्याचं वाटप व्हावं यासाठी विविध योजना सरकारनं सुरू केल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या अतिशय मागास असलेल्या घटकांसाठी सरकारने अंत्योदय योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला 35 किलो धान्य मिळत होतं. त्यासाठी माफक पैसे आकारले जात होते; मात्र आता अंत्योदय रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू व 15 किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहेत. सर्वसामान्य रेशन कार्डधारकांना 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ दिले जाणार आहेत. त्यांना गहू 2 रुपये प्रति किलो दराने व तांदूळ 3 रुपये प्रति किलो दराने मिळतील. कोरोना महामारीच्या काळापासून आतापर्यंत सरकारकडून सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत मोफत रेशनची सुविधा देण्यात आली होती. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत नागरिकांना ही सुविधा मिळते आहे. हेही वाचा: मॉलमध्ये पार्किंग शुल्क अनिवार्य असतं का? वाचा हायकोर्ट काय म्हणालं… ज्या रेशन कार्ड संचालकांजवळ तेल, मीठ आणि चण्याची पाकिटं शिल्लक आहेत, त्यांनी त्याचं अंत्योदय कार्डधारकांना मोफत वितरण करावं, असाही सरकारनं आदेश दिला आहे; मात्र त्यासाठी सरकारनं नियम ठेवला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर हे मोफत वाटप केलं जाणार आहे. साठा संपल्यावर हे साहित्य मोफत दिलं जाणार नाही.
सध्या देशातल्या 80 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना गरीब कल्याण योजनेचा फायदा मिळतो आहे. आतापर्यंत सरकारनं 10 लाख कार्डधारकांची रेशन कार्ड्स रद्द केली आहेत. अनेक अपात्र नागरिक रेशन सुविधेचा लाभ घेतात. त्यामुळे सरकारनं सर्व अपात्र नागरिकांची रेशन कार्ड्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र कार्डधारकांची माहिती डीलरकडे पाठवून त्याद्वारे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसंच त्यांच्याकडून वसुलीही केली जाईल.