मुंबई, 5 सप्टेंबर : भारताच्या मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं. मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारचा अहमदाबाद-मुंबई हायवेवर भीषण अपघात झाला. मिस्त्री यांनी सीट बेल्ड लावला नसल्याची बाब तपासात समोर आलं आहे. अपघात झाल्यास कोणतीही गंभीर दुखापत टाळण्यासाठी सीट बेल्ट लावणे अत्यंत आवश्यक आहे. कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेले बहुतांश ड्रायव्हर आणि प्रवासी सीट बेल्ट लावतात, मात्र मागे बसलेले प्रवासी बेल्ट लावणे आवश्यक मानत नाहीत. याबाबत महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सर्वांना कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट लावण्याचं आवाहन केले आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले की, ते नेहमी कारच्या मागच्या सीटवर बसले असले तरी सीट बेल्ट लावतात. हा संकल्प सर्वांनी करावा, असं आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, मी नेहमी माझा सीट बेल्ट गाडीच्या मागील सीटवर देखील घालतो आणि मी तुम्हा सर्वांना सीट बेल्ट वापरण्याची विनंती करतो.
मिस्त्री आणि TATA यांचा वाद काय होता? कोण जिकलं खटला? नंतर रतन टाटांनी केला मोठा बदल अनेक वाहन निर्मात्यांसाठी कारची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असते. ते त्यांच्या कारला सुरक्षा उपकरणे आणि तंत्रज्ञानासह ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करतात जे ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र सीट बेल्ट न घालणे आणि घाईघाईने गाडी न चालवणे यासारख्या गोष्टी कारमधील प्रवाशांवर अवलंबून असतात. मात्र काही सवयींचे पालन केल्याने जीवघेणे अपघात टाळता येऊ शकतात. सीट बेल्ट न लावल्याने अपघातात गंभीर दुखापत आणि जीव जाण्याचा धोका वाढतो. माणूस कितीही सुरक्षित आणि लक्झरी कारने प्रवास करत असेल तरी या नियमांचं पालन केले पाहिजे. 9 मिनिटांत 20 KM अंतर केलं पार; सीटबेल्टही नाही, ‘ही’ ठरली सायरस मिस्त्रींच्या अपघाताची कारणं? सील बेल्टमुळे सायरस मिस्त्री यांचे प्राण वाचू शकले असते सायरस मिस्त्री यांच्या बाबतीतही अशाच काही गोष्टी समोर येत आहेत. कारमध्ये मिस्त्री यांच्यासह एकूण 4 जण होते. हे सर्वजण आलिशान एसयूव्हीमध्ये प्रवास करत होते.अपघात झाला त्यावेळी भरधाव वेगात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकली. समोर बसलेल्यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्यांनी सीट बेल्ट घातल्याने ते सुखरूप बचावले. समोरील एअरबॅग उघडून त्यांचा जीव वाचला. मात्र मिस्त्री आणि मागे बसलेल्या अन्य एका प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला. त्यांनी सीट बेल्ट घातला नसल्याची माहिती समोर येत आहे.