JOIN US
मराठी बातम्या / मनी / ट्विटर अन् मेटापाठोपाठ आता अ‍ॅमेझॉनमध्येही होणार कर्मचारी कपात; सीईओंनी दिला दुजोरा

ट्विटर अन् मेटापाठोपाठ आता अ‍ॅमेझॉनमध्येही होणार कर्मचारी कपात; सीईओंनी दिला दुजोरा

अ‍ॅमेझॉनने आपल्या अलेक्सा व्हॉईस असिस्टंट डिव्हिजनसह इतर महत्त्वाच्या विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार केला आहे. कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागानं अनेक कर्मचाऱ्यांना स्वत: ‘बायआउट’ घेण्याच्या ऑफर पाठवल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे जगभरातील प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. ट्विटर आणि मेटापाठोपाठ आता अ‍ॅमेझॉननंदेखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी केली आहे. अ‍ॅमेझॉन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ई-कॉमर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, ऑनलाइन जाहिराती, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉनचा समावेश होतो. इतर मोठ्या कंपन्यांप्रमाणे या कंपनीवरदेखील कर्मचारी कपात करण्याची वेळ आली आहे. अ‍ॅमेझॉनने बुधवारी (16 नोव्हेंबर) आपल्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्माचारी कपात सुरू करण्याचा विचार केला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 पर्यंत अ‍ॅमेझॉन जागतिक स्तरावरील कर्मचारी कमी करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवणार आहे. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या अलेक्सा व्हॉईस असिस्टंट डिव्हिजनसह इतर महत्त्वाच्या विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार केला आहे. कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागानं अनेक कर्मचाऱ्यांना स्वत: ‘बायआउट’ घेण्याच्या ऑफर पाठवल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आता कंपनीनं याबाबत अधिकृत निवेदन दिलं आहे. या निवेदनात कंपनीचे सीईओ अँडी जेसी यांनी कर्मचारी कपातीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कंपनी येत्या वर्षात आणखी कर्मचार्‍यांना काढून टाकेल असंही सांगण्यात आलं आहे. अ‍ॅमेझॉनचे सीईओ अँडी जेसी यांनी कर्मचारी कपातीबद्दल दिलेल्या जाहीर निवदेनात असं म्हटलं आहे की, ‘आमची वार्षिक नियोजन प्रक्रिया नवीन वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ अंतर्गत अॅडजस्टमेंट सुरू ठेवल्यानं कर्मचारी संख्या कमी होईल. 2023 च्या सुरुवातीपर्यंत कामावरून कमी करण्यात येणारे कर्मचारी आणि अंतर्गंत विभागांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.’ जेसी यांनी पुढं नमूद केलं की, किती कर्मचार्‍यांना कामावरून काढलं जाईल हे कंपनीनं अद्याप निश्चित केलेलं नाही. पण, शक्यतो स्टोअर्स आणि पीएक्सटी विभागांतून कर्मचारी कपात केली जाईल. हेही वाचा -  तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं नोकरीवरून काढलं तर नाही ना? वाचा, ही बातमी त्यापूर्वी, डिव्हाईस अँड सर्व्हिस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष, डेव्ह लिंप यांनीही कंपनीत सुरू असलेल्या कर्मचारी कपातीबद्दल अधिकृत नोट शेअर केली होती. लिंप म्हणाले, “आम्ही अलीकडेच काही टीम आणि प्रोग्राम्स एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काही पदांची आणि पर्यायनं कर्मचाऱ्यांची यापुढे आवश्यकता राहणार नाही.” अ‍ॅमेझॉन सुमारे 10 हजार कर्मचार्‍यांना काढून टाकणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, डेव्ह लिंप आणि सीईओ अँडी जेस्सी यांनी कर्मचारी कपातीचा अचूक आकडा जाहीर केलेला नाही. विशेष म्हणजे, टीम आणि प्रोग्राम्स एकत्रित केले जाणार असल्यामुळं कंपनीनं कर्मचार्‍यांना कंपनीमध्येच नवीन रोल शोधण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधीही दिला आहे. कर्मचारी आपल्यासाठी नवीन काम शोधू शकले नाहीतर त्यांना ‘बायआउट’ ऑफर स्वीकारून कंपनीबाहेर पडावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या