मुंबई: कोरोना काळात लोक डिजिटल ट्रान्झाक्शनकडे वळले. त्यानंतर वाढत्या डिजिटल ट्रान्झाक्शनसोबत सायबर क्राइमचे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढायला लागले आहेत. वेगवेगळ्या मार्गाने हॅकर्स तुमच्या खात्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक चूक हॅकर्सच्या फायद्याची ठरते आणि त्यांना पैसे मिळतात. मुंबई-पुण्यात सायबर गुन्हांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मेट्रो सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ट्रान्झाक्शन होतात. याचाच फायदा हॅकर्स उचलत आहेत. एका समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत 3,668 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक, बँक खात्यातून पैसे हडपणे, OTP, KYC, लाईट बिल अशा अनेक गोष्टींचा वापर करून हॅकर्सनी खात्यातून पैसे लंपास केले आहेत. दिवसेंदिवस हॅकर्सच्या टेकनिक्स वाढत आहेत.
क्रेडिट कार्ड वापरता सावधान! तुमच्यासोबतही हे घडू शकतंआता तर तुम्ही अनोळखी व्यक्तीच्या हातात फोन दिलात तरी ते घातक ठरू शकतं. याचं कारण ती व्यक्ती तुमचे SMS आणि फोन स्वत:च्या नंबरवर फॉरवर्ड करतात. त्याद्वारे तुमचे बँकेचे OTP वापरून खातं रिकामं करत आहेत. एवढ कमी होतं की काय आता एका मिस्ड कॉलच्या आधारे बँक खातं रिकामं होत असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. केवळ एका मिस्ड कॉलमुळे खातं रिकामं झालं. हॅकर्सनी सगळी माहिती घेऊन खात्यातून पैसे काढले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॅकर्स वेगवेगळ्या योजना आखून रोज नवीन गुन्हा करत आहेत. दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे कस्टमर केअर नंबर, ऑनलाईन ऑर्डर मागवल्यानंतर ती रिटर्न केल्यानंतर मिळाऱ्या रिफंडवर, क्रेडिट कार्ड तीन गोष्टींवरून होत आहे.
लग्नसराईत सोन्याला आला भाव, तुमच्या जिल्ह्यात काय आहे दर? लगेच करा चेकतुमचं खातं कसं कराल सुरक्षित - अनोळखी व्यक्तीच्या हातात तुमचा फोन देऊ नका -ऑनलाईन ट्रान्झाक्शन करताना विशेष काळजी घ्या तुमचा पासवर्ड सतत बदलत राहा सोपा ठेवू नका कोणालाही कुठेही तुमच्या खात्याची माहिती, बँकेचे डिटेल्स किंवा OTP शेअर करू नका - तुमच्यासोबत फसवणूक झाली तर तातडीने 1930 या क्रमांकावर तक्रार करा. सायबर क्राईमच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार करा - सोशल मीडियावर अति माहिती शेअर करणंही धोक्याचं ठरू शकतं - अलर्ट राहा आणि कोणतीही थर्ड पार्टी अॅप, लिंक, फोटो व्हिडीओ शेअर करू नका, कोणत्याही ऑफरला बळी पडू नका - गुगलवरून कोणतेही कस्टमर केअर नंबर शोधू नका. तुमची फसवणूक होऊ शकते.