JOIN US
मराठी बातम्या / मनी / ऊस उत्पादकांसाठी आशादायी बातमी! सरकार देणार मोठं गिफ्ट

ऊस उत्पादकांसाठी आशादायी बातमी! सरकार देणार मोठं गिफ्ट

ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या साखर हंगामात नवे दरही जारी केले जाऊ शकतात. याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

जाहिरात

निवडणुकांपूर्वी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याच्या तयारीत आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 जून : जूनअखेरीस सुरू झालेला पाऊस आणि सततच्या तापमानवाढीमुळे भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने तळ गाठत आहे. शेतात पाण्याअभावी ऊसाचे फड डोळ्यासमोर करपून जाताना पाहून बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच ऊस उत्पादकांसाठी एक आशादायी बातमी समोर आली आहे. निवडणुकांपूर्वी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याच्या तयारीत आहे. ऊसाच्या खरेदी दरात (एफआरपी) प्रति क्विंटल 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या 305 रुपये प्रति क्विंटल असलेले ऊसाचे दर 315 रुपये प्रति क्विंटल करण्यात येतील. त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या साखर हंगामात नवे दरही जारी केले जाऊ शकतात. याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

‘पंतप्रधान प्रणाम’ योजनेला मंजुरीची शक्यता मोदी सरकार अशा एका योजनेवर काम करत आहे, ज्यामुळे शेतीत रसायनांचा वापर कमी होईल. पंतप्रधान प्रणाम योजनेअंतर्गत सरकार रासायनिक खतांना पर्याय निर्माण करण्यावर काम करणार आहे. या योजनेलाही उद्याच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. pm narendra modi : ‘त्यांच्यावर कारवाई करण्याची गॅरंटी देतो’ पंतप्रधानांचा विरोधकांना थेट इशारा पंतप्रधान प्रणाम योजनेचं उद्दिष्ट रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती करणं आणि शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणं हे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या