JOIN US
मराठी बातम्या / मनी / अलर्ट! आधारसंबंधी 'हे' काम कोणी पैसे घेऊन करत असेल, तर अशी करा तक्रार

अलर्ट! आधारसंबंधी 'हे' काम कोणी पैसे घेऊन करत असेल, तर अशी करा तक्रार

आधारशी संबंधित सर्व्हिस देणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (Unique Identification Authority of India) नागरिकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : आधार कार्ड (Aadhaar Card) आता देशातील लोकांच्या ओळखीचं दुसरं नावच बनलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं सरकारी ओळखपत्र आहे. आता सरकारी कामांसह प्रायव्हेट कंपन्या आणि इतर ठिकाणीही आधार कार्ड गरजेचं आहे. आधारशी संबंधित सर्व्हिस देणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (Unique Identification Authority of India) नागरिकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ऑपरेटर्स नियुक्ती - यूआयडीआयएने (UIDAI) एका ट्विटमध्ये सांगितलं की, आधार ऑपरेटर्सची नियुक्ती यूआयडीआयए नाही, तर ती रजिस्ट्रारकडून केली जाते. आधार सेंटर ऑपरेटर बनण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील रजिस्ट्रारशी संपर्क करावा लागतो. त्यामुळे जर कोणी पैसे घेऊन आधार सेंटर ऑपरेटर बनवण्याचा दावा करत असल्यास सावध व्हा. अशाप्रकारे कोणी पैसे मागितल्यास, 1947 नंबरवर कॉल करून त्याची तक्रार दाखल करा. रजिस्ट्रारविषयी इतर माहितीसाठी https://uidai.gov.in/ecosystem/enrolment-ecosystem/registrars.html वर क्लिक करा. (वाचा -  ‘हा’ रक्तगट असलेल्यांना कोरोनाचा सर्वात कमी धोका;व्हिटॅमिन डी बाबतही मोठा खुलासा ) 24 तास हेल्पलाईन - आधारसंबंधी सर्व समस्या एका फोन कॉलवर दूर होऊ शकतात. आधार कार्डसंबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास टोल फ्री हेल्पलाईन 1947 वर कॉल करू शकता. ही हेल्पलाईन हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, असामिया आणि उर्दू अशा 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा नंबर लक्षात ठेवणंही सोपं आहे, त्याचवर्षी देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं.

संबंधित बातम्या

या हेल्पलाईनवर इंटरॅक्टिव्ह वॉईस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) सपोर्ट 24 तास उपलब्ध आहे. कॉल सेंटर प्रतिनिधी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत सोमवारी ते शनिवार उपलब्ध असतात. तर रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत उपलब्ध आहे. कोणीही पैसे देऊन आधार ऑपरेटर बनवण्याचा दावा करत असल्यास, त्याला बळी पडू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या