आधार युजर्सने आधारच्या सुरक्षेबाबत सदैव दक्ष असले पाहिजे.
मुंबई, 17 ऑक्टोबर : आधार कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आधार कार्डचा ट्रेंड वाढल्याने त्याचा गैरवापर होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. आधारचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार केवळ आर्थिक फसवणूक करत नाहीत, तर काही गुन्हेगारी कारवायांमध्येही त्याचा वापर करत आहेत. आता तुमचं आधार कोणीही वापलं तरी लगेच तुमच्या मोबाईलवर अलर्ट येईल. त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. आधार युजर्सनी त्यांचा ई-मेल आयडी आधारशी लिंक केल्यास त्यांना मोठा फायदा होईल, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्था यूआयडीएआयचे म्हणणे आहे. आधार क्रमांक कोठेही वापरण्यासाठी ऑथेंटिकेट केल्यावर, वापरकर्त्याला त्याची माहिती लगेच मिळणार आहे. जिथे जिथे आधार वापरला जातो तिथे ते ऑथेंटिकेट केले जाते. अशावेळी जर तुमचा ई-मेल आयडी आधारशी लिंक असेल तर त्याचवेळी ई-मेलवर एक अलर्ट मॅसेज येईल. लिंक कसे करावे? यूआयडीएआयने ट्विट केले आहे की आधार कार्डमध्ये तुमचा ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी आणि लिंक करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. आजकाल जवळपास प्रत्येक शहरात आधार केंद्रे आहेत. तेथे नवीन आधार तयार करणे आणि अपडेट करणे यासह सर्व काम केली जातात. तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राची माहिती https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ वर मिळेल. वाचा - सावधान! सायबर चोर ‘या’ चार मार्गानं करतात तुमची फसवणूक, एका चुकीमुळे व्हाल कंगाल आधारकार्डला 10 वर्ष झाली असेल तर अपडेट करा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आता अशा लोकांना त्यांच्या आधार कार्डचे सर्व तपशील अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यांचा युनिक आयडी 10 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. जो त्यांनी त्यानंतर कधीही अपडेट केलेला नाही. यूआयडीएआयने आधार कार्ड धारकांना ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याशी संबंधित कागदपत्रे अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करता येतो. तसे करणे बंधनकारक नसल्याचे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे. पण, ते आधारधारकांच्या हिताचे आहे. UIDAI म्हणते की आधार ऑनलाइन अपडेट करण्यासाठी, मायआधार पोर्टलला भेट द्यावी लागेल. त्याचबरोबर आधारधारक आधार केंद्रावर जाऊनही हे काम करू शकतात.