आधारसंबंधीत कामं होणार सोपी
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: देशातील प्रत्येक नागरिक आधार कार्ड चा वापर करतो. आधारशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी सध्या तुम्हाला केंद्रावर जावे लागते. अन्यथा हेल्पलाइन नंबरवर कॉल करावा लागतो. परंतु UIDAI च्या पुढाकाराने आता तुम्हाला चॅटबॉटच्या माध्यमातून आधारशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे एका झटक्यात मिळणार आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ( UIDAI ) ने आर्टिफिशियल इंटेलीजेंस (AI) आणि मशीन लर्निंगने सुसज्ज आधार चॅटबॉट लॉन्च केलाय. आधार मित्र नावाच्या या चॅटबॉटद्वारे ग्राहकांना त्यांच्या आधारशी संबंधित सर्व माहिती त्वरित मिळू शकणार आहे. यामध्ये आधार पीव्हीसीची टेटस, रजिस् आणि तक्रारी ट्रॅक करणे आणि आणि त्याची रियल टाइमसंबंधित माहिती मिळवता येऊ शकेल.
आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेसUIDAI ने ऑफिशियल ट्विटमध्ये सांगितले आहे की, भारतीय नागरिकांशी जोडण्यासाठी AI आणि मशीन लर्निंग आधारित चॅटबॉट लॉन्च करण्यात आलाय. आता लोक आधार पीव्हीसी कार्डचे टेटस, रजिस्ट्रेशन आणि तक्रारी सहजपणे ट्रॅक करू शकतील. https://uidai.gov.in/en या लिंकद्वारे तुम्ही आधार मित्र वापरू शकता. याशिवाय UIDAI ने ट्विटमध्ये QR कोड देखील जारी केला आहे, जो स्कॅन करून तुम्ही थेट आधार मित्राच्या चॅटबॉटवर पोहोचू शकता.
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, आता UIDAI कडे तक्रार निवारणासाठी एक चांगले साधन असणार आहे. हे UIDAI हेडक्वार्टर आणि प्रादेशिक कार्यालये, तांत्रिक केंद्रांसह सर्व भागीदारांशी थेट जोडले जाईल. आधारच्या माध्यमातून केवळ जीवनातील सुलभता वाढली नाही, तर व्यवसाय करण्याची सुलभताही सुधारली आहे.
आधार कार्डमध्ये नाव चुकलंय? ‘या’ ट्रिकने घरबसल्या करा करेक्टUIDAI च्या नवीन चॅटबॉट ‘आधार मित्र’ वरून अनेक माहिती त्वरित मिळवू शकतात. यामध्ये आधार केंद्राचे लोकेशन, नावनोंदणी किंवा अपडेटचे टेटस आणि व्हेरिफिकेशन, पीव्हीसी कार्ड ऑर्डरची स्थिती, तक्रार करणे आणि त्याचे स्टेटस जाणून घेणे, इनरोलमेंट सेंटरचे लोकेशन, अपॉइंटमेंट बुकिंग आणि व्हिडिओ फ्रेम इंटीग्रेशन यासारखी माहिती उपलब्ध असेल. हा चॅटबॉट तुम्हाला टेक्स्ट मेसेजसह व्हिडिओद्वारेही माहिती देईल. आधारच्या ताज्या माहितीनुसार ते वेळोवेळी अपडेट केले जाईल.
-सर्वप्रथम तुम्हाला www.uidai.gov.in वर जावे लागेल. -आधार मित्राचा बॉक्स होम पेजच्या खालच्या उजव्या बाजूला फ्लॅश करताना दिसेल. -या बॉक्सवर क्लिक करताच चॅटबॉट उघडेल. -आता तुम्हाला तुमचा प्रश्न विचारण्यासाठी ‘Get Started’ वर क्लिक करावे लागेल. -तुम्ही तुमचा प्रश्न सर्च बॉक्समध्ये विचारू शकता.