Aadhar card
मुंबई, 8 जून : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयने (UIDAI) भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड (Aadhar Cards) जारी केलं आहे. आधार क्रमांकाच्या रुपात प्रत्येक नागरिकासाठी खास 12 अंकी क्रमांक (Unique Number) देण्यात आला आहे. विविध सरकारी कामांसाठी हा क्रमांक फार उपयुक्त आणि महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे या आधार क्रमांकाच्या सुरक्षेचा प्रश्न संवेदनशील ठरत आहे. आधार क्रमांकाचा अयोग्य पद्धतीने वापर करून फसवणूक होत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा घटना कमी करण्यासाठी तुम्ही व्हर्च्युअल आयडी (VID) वापरू शकता. व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय? यूआयडीएआय वेबसाइटनुसार, ‘व्हीआयडी हा तात्पुरता रिव्होकेबल 16 अंकी रँडम क्रमांक (Random Number) आहे. हा क्रमांक आपल्या आधार क्रमांकासह मॅप केलेला आहे. जेव्हाजेव्हा प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी केलं जातं तेव्हा आधार क्रमांकाऐवजी हा व्हीआयडी क्रमांक वापरता येऊ शकतो. आधार क्रमांक वापरल्याप्रमाणे व्हीआयडी क्रमांक वापरून प्रमाणीकरण केलं जाऊ शकतं.’ व्हीआयडीवरून आधार क्रमांक मिळवणं शक्य नाही, असं यूआयडीएआयचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाच्या जागी तुमचा व्हर्च्युअल आयडी वापरत असाल तर कोणीही तुमचा आधार क्रमांक मिळवू शकत नाही. RBI Hike Repo Rate: RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ, EMI चा बोजा वाढणार आधार जारी करणाऱ्या प्राधिकरणाने वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीची (Personal Data) सुरक्षा मजबूत करण्यासाठी व्हर्च्युअल आयडी किंवा व्हीआयडी सेवा सुरू केली आहे. हे प्रमाणीकरणाच्या उद्देशाने आधार क्रमांकाच्या जागी वापरलं जातं. एयूए किंवा केयूएसारखी (AUA/KUA) इतर कोणतीही संस्था आधार क्रमांक धारकाच्या वतीने स्वत: व्हीआयडी तयार करू शकत नाही. शिवाय कोणतीही एजन्सी तुमचा व्हीआयडी संग्रहित (Store) ठेवू शकत नाहीत. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी RBI चा नवीन नियम लवकरच लागू होणार; काय आहे नियम? व्हीआयडी कसा तयार करावा? व्हीआयडी केवळ आधार क्रमांकधारक व्यक्तीच्या मदतीने तयार केला जाऊ शकतो. आधार क्रमांकधारकांना त्यांचा व्हीआयडी तयार करण्यासाठी, तयार केलेला व्हीआयडी विसरल्यास तो पुन्हा मिळवण्यासाठी आणि अगोदरच्या व्हीआयडीच्या जागी नवीन क्रमांक मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय यूआयडीएआयचं अधिकृत पोर्टल, ई-आधार डाउनलोड, आधार नोंदणी केंद्र, एमआधार मोबाईल अॅप्लिकेशन इत्यादीद्वारे हे पर्याय भविष्यात उपलब्ध असतील. सध्या फक्त यूआयडीएआयच्या पोर्टलवर व्हीआयडीची सुविधा (VID Generation Facility) उपलब्ध आहे, असं यूआयडीएआयने आपल्या वेबसाइटवर म्हटलं आहे. ऑनलाईन व्हीआयडी तयार करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. » सर्वांत अगोदर http://uidai.gov.in/ या यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर जा. » तुम्हाला एक ड्रॉपडाउन मेन्यू दिसेल. तिथे माय आधार हा पर्याय निवडा आणि आधार सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करा. » आता व्हर्च्युअल आयडी जनरेटर या पर्यायावर क्लिक करा. » तुम्हाला आता एका नवीन पेजवर नेलं जाईल जिथं तुमचा व्हीआयडी जनरेट केला जाईल. » तिथे तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा. » त्यानंतर सेंड ओटीपी (Send OTP) पर्यायावर क्लिक करा. तुमच्या आधारसोबत जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल. » लॉग इन करण्यासाठी ओटीपी भरा आणि जनरेट व्हीआयडी पर्यायवर क्लिक करा. » त्यानंतर व्हेरिफाय आणि प्रोसिड या पर्यायांवर क्लिक करा. » तुमचा व्हीआयडी पाठवला गेला आहे, असा फ्लॅश मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. » आता तुमच्या मोबाईल क्रमांकावर तुमचा युनिक आधार व्हर्च्युअल आयडी मिळेल. जो तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाच्या जागी वापरू शकता. आपला आधार क्रमांक सुरक्षित रहावा यासाठी व्हर्च्युअल आयडीचा वापर करणं योग्य ठरू शकतं.