मुंबई, 4 एप्रिल : इंधन दरवाढ आणि महागाई यामुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यात एका व्हायरल मेसेजमुळे (Viral Massage) लोकांची डोकेदुखी आणखी वाढली होती. घर आणि दुकानांच्या भाड्यावर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते, असा मेसेजे व्हायरस होत आहे. यावर आता PIB Fact Check ने स्पष्टीकरण दिलं आहे. देशातील वस्तू आणि सेवा कर (GST) च्या नियमांचे नियमन करण्यासाठी GST परिषद वेळोवेळी बैठक घेते. या बैठकांमध्ये जीएसटीच्या नियमांबाबत जनतेचे भले लक्षात घेऊन अनेक नियम केले जातात. यासोबतच कराचे दर आणि नियमांमध्येही अनेकदा बदल करण्यात आले आहेत. Home Loan घेणाऱ्यांसाठी आता ‘हा’ लाभ मिळणार नाही, दीड लाखांची सूट बंद काय आहे व्हायरल मेसेज? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये जीएसटी कौन्सिल (GST Council Meeting) आपल्या पुढील बैठकीत घर आणि दुकानांच्या भाड्यावर 12 टक्क्यांपर्यंत कर आकारण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याचे बोलले जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पोस्टरसह हा मेसेज प्रसारित केला जात आहे.
HDFC-HDFC Bank merger : HDFC खातेधारकांसाठी मोठी बातमी, बँकेच्या विलीनीकरणाचा होईल सर्वाधिक फायदा
सत्य काय आहे? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजचीही चौकशी केली. हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. अर्थ मंत्रालय किंवा जीएसटी परिषदेने पुढील बैठकीसाठी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. PIB ने लोकांना अशा दिशाभूल करणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या पोस्ट टाळण्याचा सल्ला दिला आहे. लोकांनी अशा पोस्ट शेअर करण्यापासून दूर राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे.