JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / थर्टी फर्स्टची पार्टी बेतली जीवावर; गोंदियातील तरुणाचा गाढवी नदी पात्रात बुडून मृत्यू

थर्टी फर्स्टची पार्टी बेतली जीवावर; गोंदियातील तरुणाचा गाढवी नदी पात्रात बुडून मृत्यू

youth died while celebrating 31st December party: एका 28 वर्षीय तरुणाचा पार्टी करताना मृत्यू झाला आहे. गोंदियातील गाढवी नदीत या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

जाहिरात

थर्टी फर्स्टची पार्टी बेतली जीवावर; गोंदियातील तरुणाचा गाढवी नदी पात्रात बुडून मृत्यू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोंदिया, 1 जानेवारी : नवीन वर्षाचं स्वागत करण्यापूर्वी आणि सरत्या वर्षाच्या शेवटी सर्वचजण पार्टी, विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. मात्र, थर्टी फर्स्टची पार्टी (31st December Party) एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. पार्टी करण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय मुलाचा नदी पात्रात बुडून मृत्यू (youth drowned in river) झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात (Gondia district) ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महागाव येथील राहुल काळसर्पे हा तरुण आपला मोठा भाऊ रवी पंढरी काळसर्पे आणि काही मित्रांसोबत केशोरी येथून जवळच असलेल्या खोळदा येथे नववर्षाच्या पुर्वसंध्येला पार्टीसाठी पोहोचले होते. यावेळी पाण्याच्या मोह न आवरल्याने मौज मस्तीसाठी राहुल काळसर्पे नदी पात्रात उतरला. जेवन बनवून राहुल हा आपला भाऊ आणि इतर मित्रांसोबत मजा मस्ती करण्यासाठी गाढवी नदीच्या पात्रात उतरला. नदी पात्रात खोल असलेल्या डोहात तो गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल बुडू लागला. तो पाण्यात दिसेनासा झाल्याने त्याच्या मोठ्या भावाने गावातील लोकांच्या मदतीने शोध कार्य सूरु केले. अखेर सायंकाळच्या सुमरासा त्याचा मृतदेह आढळून आला. वाचा :  वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू, 20 जखमी या घटनेची माहिती मिळताच अर्जुनी, मोरगाव आणि केशोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी राहुल काळसर्पे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन केशोरी येथे करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत 2022 या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र नागरिकांनी मोठ्या जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं. जगात सर्वात पहिल्यांदा नव्या वर्षांचं स्वागत केलं जातं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात. जगभरात सर्वत्र नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. कोरोनाचे निकष पाळत नागरिकांनी उत्साहानं नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करून आनंद साजरा करण्यात आला. जगातील प्रत्येक देशात सूर्यास्त आणि सूर्योदय यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पृथ्वीचा जो भाग सूर्यापासून सर्वात अगोदर दूर जातो, तिथं सर्वात लवकर दिवस मावळतो आणि उगवतो. त्यानुसार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात सर्वात अगोदर रात्रीचे बारा वाजत असल्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत तिथं सर्वात आधी केलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या