JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यास आवडेल का? सुप्रिया सुळेंनी दिले स्पष्ट उत्तर

राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यास आवडेल का? सुप्रिया सुळेंनी दिले स्पष्ट उत्तर

’ मी याबद्दल काही सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष्य सांगणारी नाही. मी मुख्यमंत्री व्हावं…'

जाहिरात

' मी याबद्दल काही सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष्य सांगणारी नाही. मी मुख्यमंत्री व्हावं...'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उस्मानाबाद, 29 मे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी आज तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आगामी काळात राष्ट्रवादीचा (ncp) मुख्यमंत्री (cm maharashtra) होऊ दे, असं साकडं देवीला घातलं आहे. तसंच, मी मुख्यमंत्री व्हावं असा विचार कधी केला नाही,याचा निर्णय राज्याची जनताच घेईल, अशी प्रतिक्रियाही सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहे. आज दुपारी त्यांनी आपला पदाधिकाऱ्यांसह तुळजाभवनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी  सुप्रिया सुळे यांच्याकडून देवीला साकडं घालण्यात आले. ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं सुप्रिया सुळे यांनी घातलं. ‘खरंतर आपल्याला काय मिळाले, याबद्दल देवळात आभार मानण्यासाठी येत असते. मंदिरात आल्यानंतर इथं जमलेले कार्यकर्ते आणि पुजारी यांनी काही तरी मागणी करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी राज्यात चांगला पाऊस पडू दे, देशातला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्याला दिलासा मिळू दे, असं साकडं घातलं, असं सुळे यांनी सांगितलं. यावेळी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी होणार, असं पत्रकरांनी विचारले असता, सुळे म्हणाल्या की,  ’ मी याबद्दल काही सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष्य सांगणारी नाही. मी मुख्यमंत्री व्हावं याबद्दल कधी विचार केला नाही. महाराष्ट्राची जनता ही राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवेल, मी ठरवू शकत नाही’ असं स्पष्ट उत्तर सुळे यांनी दिलं. ( Daily Horoscope :उद्या कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका,या राशींनी अधिक काळजी घ्या ) दरम्यान, आज दुपारी  सुप्रिया सुळे यांचा ताफा काही मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला.  राष्ट्रवादीचे मुस्लिम नगरसेवक आणि कार्यकर्ते नाराज  होते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवला. सुप्रिया सुळे यांनीही रस्त्यावर गाडी बाजूला घेतली आणि नाराज कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर  त्यांनी नाराज कार्यकर्ते  स्वतःच्या गाडीत बसविले आणि त्या स्वतः दुसरी गाडीत बसल्या. ( भाजपचं ठरलं! राज्यसभेची तिसरी जागा लढवणार, धनंजय महाडिकांना उमेदवारी जााहीर ) मुस्लिम समाजाला उस्मानाबाद दौऱ्यात स्थान न दिल्याने व एक ही कार्यक्रम न घेतल्याने कार्यकर्ते नाराज होते. तसंच, सुळे यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला भेट न दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते.  अखेरीस पुढील कार्यक्रमस्थळी जाणार असल्यामुळे तिथे जाऊन सुप्रिया सुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांची पहिली बैठक घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या