JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फ्रेंड रिक्वेस्ट न स्विकारल्याने कार्यकर्त्याच्या पत्नीला मेसेज; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

फ्रेंड रिक्वेस्ट न स्विकारल्याने कार्यकर्त्याच्या पत्नीला मेसेज; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या (swabhimani sambhaji brigade) एका बड्या नेत्याने आपल्याच एका कार्यकर्त्याच्या पत्नीला अश्लील इशारे केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जाहिरात

माधव देवसरकर असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड, 20 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) माजी नगरसेवकानं (Former Corporator) आपल्या मित्राच्या पत्नीकडे शरीरसुखाची (Demand Sexual relation at friend’s wife) मागणी केली होती. त्यानंतर देशात बरीच टीका करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता, स्वभामानी संभाजी ब्रिगेडच्या (swabhimani sambhaji brigade) एका बड्या नेत्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहे. संशयित आरोपीनं आपल्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीला अश्लील इशारे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR Lodged) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. माधव देवसरकर (Madhav Devsarkar) असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. ते स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. संशयित आरोपी देवसरकर याने स्वाभीमानी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्रास दिला आहे. तसेच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून तिला मेसेजही केले आहेत. हेही वाचा- नाशिक: महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्रांताधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ शिवाय पीडित महिला घरासमोर उभी असताना तिला लज्जास्पद इशारेही केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. याबाबत पीडित महिला आणि तिचा पती सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याची माहिती पीडित महिलेनं पत्रकार परिषदेत दिली आहे. हेही वाचा- ठाण्यात MNS कार्यकर्त्यांचा तुफान राडा; टोल नाक्याची तोडफोड करतानाचा LIVE VIDEO पण पत्रकार परिषद घेतल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं आहे. यानंतर सिडको ग्रामीण पोलिसांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधव देवसरकर याच्या विरोधात कलम 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या