JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राणा-कडू वादावर 'सागर'मध्ये तोडगा निघणार? शिंदे-फडणवीसांनी दोघांनाही बोलावलं!

राणा-कडू वादावर 'सागर'मध्ये तोडगा निघणार? शिंदे-फडणवीसांनी दोघांनाही बोलावलं!

महाराष्ट्राच्या विकासाची खुंटकेली गती वाढवण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करुन राज्यातील 50 आमदारांनी स्वतः हून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 30 ऑक्टोबर : आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला होता. यानंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. आता आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद हा शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री सागर बंगल्यावर -  आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा भेटीत नवीन ट्विस्ट समोर आले आहे. दोनही आमदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट होणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सागर बंगल्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीसांच्या नेतृत्वात या वादावर तोडगा निघणार आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर आता यानंतर राणा व कडू वादावर तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा -  “राणा, फाना हवेच्या फुटान्यासारखे फोडून…”; बच्चू कडूंचा जोरदार प्रहार बच्चू कडू काय म्हणाले होते - ‘महाराष्ट्राच्या विकासाची खुंटकेली गती वाढवण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करुन राज्यातील 50 आमदारांनी स्वतः हून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तर मंत्री असूनही त्याचा त्याग केला आणि शिंदेना समर्थन दिले. त्यावेळेपासून ठाकरे गटाकडून या 50 आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप होत आहेत,’ असं बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे 50 आमदारांना खोके दिले का? हे आता शिंदे-फडणवीस यांनीच स्पष्ट करावे, असे बच्चू कडू म्हणाले होते. ‘सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. त्यामुळे मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्ही दाखल केला आहे. आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागवी, त्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा जोरदार पलटवार बच्चू कडूंनी केला होता. या वादावर आता काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या