औरंगाबाद, 17 सप्टेंबर : पत्नीने चाकूने भोसकून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मध्य रात्रीच्या सुमारास औरंगाबाद शहरातील उल्कानगरी भागात हा प्रकार घडला आहे. पत्नीकडून पतीची अशी निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत. शैलेश राजपूत असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. रात्री घरात वाद झाल्याने पत्नीने रागात पतीची हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पत्नीने रागात चाकूने पतीवर वार केले. यात पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. घरात असलेल्या 6 वर्षाच्या चिमुकलीने नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती पत्नीमध्ये जेव्हा वाद झाला. तेव्हा घरात त्यांचा सहा वर्षाचा मुलगा होता. त्याच्यासमोरच दोघांमध्ये वाद शिगेला गेला आणि पत्नीने रागाच्या भरात पतीवर चाकूने वार केला. या हल्ल्यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. मुलाने फोन करून नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. इतर बातम्या - उलट्या काळजाची आई, 9 तासांआधी जन्मलेल्या बाळाला फेकलं काटेरी झुडप्यात! पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. तर संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. पत्नीने टोकाचं पाऊल उचलत पतीची हत्या का केली याचं अद्याप कारण समजू शकलेलं नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून पतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. इतर बातम्या - ‘दादा-दादा’ म्हटल्यावरही नराधमांनी ओरबाडलं, तरुणीवर चौघांकडून सामूहिक बलात्कार पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तर डोळ्यांदेखत वडिलांची हत्या झाली आणि आईवरही गुन्हा दाखल झाल्यामुळे मुलगा पोरका झाला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातही यावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. इतर बातम्या - युतीवर वाद अद्याप मिटला नाही, शिवसेनेनं दिला नवा फॉर्म्युला! विधानसभेआधी पवार काका-पुतण्यात भवगा वाद? पाहा SPECIAL REPORT