JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / परभणीमध्ये नगरपंचायत निवडणुकीसाठी पैसे वाटप करताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पकडलं

परभणीमध्ये नगरपंचायत निवडणुकीसाठी पैसे वाटप करताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पकडलं

मागील दोन्ही विधानसभा निवडणुकी दरम्यान मतदारसंघामध्ये पैशाचा अक्षरशः पूर आला होता आणि आजही नगरपंचायत निवडणुकीसाठी…

जाहिरात

मागील दोन्ही विधानसभा निवडणुकी दरम्यान मतदारसंघामध्ये पैशाचा अक्षरशः पूर आला होता आणि आजही नगरपंचायत निवडणुकीसाठी...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

परभणी, 20 डिसेंबर : परभणी (Parbhani ) जिल्ह्यातील पालम नगरपंचायत निवडणुकीसाठी ( Nagar Panchayat elections in Parbhani) मंगळवारी होणाऱ्या मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना पैसे देऊन मतदान खरेदी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) पदाधिकाऱ्याला पैसे वाटप करताना पकडण्यात आले आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा राज्यामध्ये मागील दोन निवडणुकांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता आणि त्याला कारणही तसंच आहे. मागील दोन्ही विधानसभा निवडणुकी दरम्यान, मतदारसंघांमध्ये पैशाचा अक्षरशः पूर आला होता. निवडणूक विभागाने केलेल्या कारवाईत अनेक वेळा मोठ्या प्रमाणात रक्कमही जप्त करण्यात आल्या आणि त्यामुळे राज्यभरात गंगाखेड विधानसभा मतदारसंघ म्हणजे,‘लक्ष्मीपुत्रा’साठी निवडणुकीचे मैदान अशी ख्याती निर्माण झाली होती. राजकारणातील सर्वात मोठी बातमी ! शिवसेना युपीएत सहभागी होणार आता त्याच मतदारसंघातील नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये देखील, लक्ष्मी अस्त्राचा वापर अमाप स्वरूपात सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी पैसे वाटपाचा प्रकार उघडकीस आला आहे. नगरपंचायतीच्या एका प्रभागांमधील मतदानासाठी हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन पैसे वाटप करत असल्याचं उघडकीस आलं. ॉ सिनेमा पाहायला थिएटरमध्ये आला Spider Man चा फॅन, महिलेचा प्रश्न ऐकून झाला गारद नगरपंचायतीची निवडणूक उद्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपला उमेदवार कसा विजयी होईल यासाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. त्या अंतर्गत पैसे वाटप केले जात असल्याचं पुढं आल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत अन्य काही कार्यकर्त्यांनाही, पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून नगदी रक्कम आणि मतदारांच्या याद्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एकूणच निवडणुका छोट्या असो की मोठ्या, या निवडणुका जिंकण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावतात आणि त्या मधून पाण्यासारखा पैसा ओतला जातो. निवडणुकांमध्येही लक्ष्मी अस्त्राचा मुक्तपणे होत असलेला वापराने पुन्हा एकदा गंगाखेड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या