JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / परप्रांतीय युवकाकडून विवाहितचा विनयभंग, पाठवला लज्जा उत्पन्न करणारा मेसेज

परप्रांतीय युवकाकडून विवाहितचा विनयभंग, पाठवला लज्जा उत्पन्न करणारा मेसेज

सदर महिलेच्या नातेवाईक जाब विचारण्यास गेले असता त्याने त्यांच्याशी देखील उद्धट वर्तन केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर,27 डिसेंबर: गडहिंग्लज पोलिसांनी एका परप्रांतीय युवकाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दुकानातील महिलेला अश्लिल हावभाव करून तिच्या मोबाइलवर मनात लज्जा उत्पन्न होईल, असा मेसेज पाठवला होता. या प्रकरणी पीडितेने आरोपीविरूद्ध पोलिसांत तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. **दिला बेदम चोप…**मिळालेली माहिती अशी की, हिम्मत असे आरोपी युवकाचे नाव असून तो मूळचा राजस्थानातील आहे. सध्या तो गिजवणे (ता.गडहिंग्लज) येथे राहतो. गडहिंग्लज येथील लक्ष्मी रोडवर त्याचे राज लक्ष्मी नावचे स्वीटमार्ट आहे. लक्ष्मी रोडवर असणाऱ्या एका दुकानातील महिलेस हातवारे करून तसेच तिच्या मोबाइल लज्जा उत्पन्न होईल, असे मेसेज टाकून महिलेस त्रास दिला होता. शुक्रवारी सकाळी त्याला सदर महिलेच्या नातेवाईक जाब विचारण्यास गेले असता त्याने त्यांच्याशी देखील उद्धट वर्तन केले. यावेळी सबंधित नातेवाईकांनी युवकाला बेदम चोप दिल्याची माहिती मिळाली आहे. एवढेच नाही तर संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या बेकरीतील साहित्याचीही तोडफोड केली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान,परप्रांतीय युवकांकडून विवाहित महिलेस असा त्रास दिल्याने गडहिंग्लज शहरात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. पत्नीचा मोडला पाय, मुलगाही झाला जखमी; संतप्त पतीचे रस्त्यावरच झोपून आंदोलन महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आंदोलन कोल्हापूर शहरात केली जातात. चळवळीचं शहर म्हणूनही कोल्हापूरची ओळख आहे. पण एक व्यक्ती आपल्या आंदोलनामुळे कोल्हापूरसह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. फुलेवाडी-बालिंगा रोडवर एका संतप्त वाहनचालकाने चक्क रस्त्यावर झोपून आंदोलन केले. रोडवरील खड्ड्यामुळे गाडीला अपघात झाला. त्यात महिलेचा पाय मोडला. तिच्या संतप्त पतीने मार्गावर झोपून रस्ता अडवला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी-बालिंगा दरम्यानचा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. महिनाभरात अनेक अपघात झाले आहेत. कोल्हापूर शहरातून गगनबावड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. कोल्हापूरजवळ फुलेवाडी नावाचे उपनगर आहे. रंकाळा तलावापासून फुलेवाडीला जाताना या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. याच खड्ड्यांमुळे फुलेवाडीमधील रहिवासी शिल्पा पोरे आणि त्यांचा मुलगा शौर्य हे दोघे दुचाकीवरून जाताना पडले. यावेळी शिल्पा आणि शौर्य हे दोघेही जखमी झाले. शिल्पा यांचा पाय फ्रेक्चर झाला. त्यानंतर विजय पोरे यांनी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. पण पत्नी आणि मुलाच्या वेदना पाहून विजय पोरे यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केले. रंकाळा-गगनबावडा मार्गावरचा एका पतीचा हा आक्रोश संपूर्ण कोल्हापूरने पाहिला, विजय हे जवळपास 2 तास खड्ड्यात झोपून होते. यावेळी जवळपास तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, असा पवित्रा विजय यांनी घेतला होता. पण पोलिसांनी कशीबशी विजय यांची समजूत काढली. बांधकाम विभागाकडे याबाबत पाठपुरावा करू, महापालिकेकडेही करू असा शब्द पोलिसांनी दिल्यावर विजय यांनी आपल आंदोलन मागे घेतले. कोल्हापूर रंकाळा गगनबावडा हा तळकोकणात जाणारा प्रमुख राज्यमार्ग आहे. पण फुलेवाडी परिसरात 100 मिटर अंतराच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. याचा त्रास शहरवासियांना होत असूनही प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या