JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'हिंदू संतांची मदत केली नसल्यानेच फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद गेले'

'हिंदू संतांची मदत केली नसल्यानेच फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद गेले'

प्रताप गडाच्या पायथ्याशी अफजल खानाचे थडगे आहे. ते थडगे काढण्याऐवजी त्याला जागा मिळत आहे. मात्र समाज उपयोगी कामं करत असलेल्या बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम पाडण्याचे काम केले जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विरेंद्र उत्पात, पंढरपूर 03 डिसेंबर : मी पुन्हा येणार…मी पुन्हा येणार अशी गर्जना करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना प्रयत्न करूनही मुख्यमंत्रिपदावर येता आलं नाही. त्यावरून आता त्यांच्यावर टीकचे प्रहार सुरू झाले आहेत. वादग्रस्त मिलिंद एकबोटे यांनी फडणवीसांवर टीका केलीय. हिंदू संतांची त्यांनी मदत केली नाही त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं अशी टीकाही एकबोटे यांनी केलीय. भीमा कोरेगाव प्रकरणावरून पोलिसांनी एकबोटेंना अटकही केली होती त्या रागातूनच त्यांनी ही टीका केल्याचं बोललं जातंय. पंढरपूर इथं अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने हिंदू संमेलन घेण्यात आलं त्यात ते बोलत होते. PM नरेंद्र मोदींनी दिलेल्या मंत्रिपदाच्या ऑफरवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? एकबोटे म्हणाले, प्रताप गडाच्या पायथ्याशी अफजल खानाचे थडगे आहे. ते थडगे काढण्याऐवजी त्याला जागा मिळत आहे. मात्र समाज उपयोगी कामं करत असलेल्या बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम पाडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. अखिल भारत हिंदू महासभाच्या वतीने पंढरपुरात जागो हिंदू संमेलन घेण्यात आलंय. त्यात विविध संप्रदायांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. या संमेलानात प्रभावी गोरक्षण, हिंदुत्वावरील आघात, तीर्थक्षेत्रांचं पावित्र्य, बालयोगी सदानंद महाराज आश्रम बचाव या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारत हिंदुमहासभेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक उपस्थित होते. कत्तलखान्यातील पैसे हे दहशतवादासाठी जातात. यामुळे कत्तलखाने बंद केले पाहीजे असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीसांनी केला पंकजा मुंडे यांना फोन, म्हणाले…

या संमेलनात अनेक कट्टरपंथी संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यांनी त्यात अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाची ठिणगी पडण्याती शक्यता व्यक्त केली जातेय. या सभेत अनेक वक्तत्यांनी नथुराम गोडसेचाही उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या