अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या विरोधात दाखल केलेल्या पोलीस तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने...
जळगाव, 02 मे : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता येणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. ‘भाजपने संपूर्ण ताकदपणाला लावली पण पदरी निराशाच आली आहे. बंगालच्या जनतेनं ममतादीदींना साथ देऊन भाजपला दूर सारले’, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) भाजपवर (BJP) केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, 200 पेक्षा अधिक जागांवर तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या निकालावर आपली भूमिका मांडली आहे. Facebook भारतात लाँच करणार Vaccine Finder टूल; तुम्हाला असा होणार फायदा ‘पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला दोन तृतीयांश मतदानाकडे सध्या वाटचाल सुरू आहे. अशा स्वरूपाचे आज दिसत आहे. पश्चिम बंगालची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भारतीय जनता पार्टीचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी त्याठिकाणी प्रचारासाठी होते. या ना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली होती, असा टोला खडसे यांनी भाजपला लगावला.
‘पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एक वेळ तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून जनतेने दूर ठेवले आहे’, अस म्हणत एकनाथ खडसे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.