JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील सीमावादात (border dispute) पुन्हा एकदा ठिगणी पडली आहे. हुतात्मादिनी (martyr day) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर (statement) कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी कडवी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 18 जानेवारी: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील सीमावादात पुन्हा एकदा ठिगणी पडली आहे. काल हुतात्मादिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी कडवी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे भाषिक सीमावादावरून पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी म्हटलं की, ‘हे दुर्दैव आहे, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. आमच्या ताब्यात असलेली एक इंचही जमीन आम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला येऊ देणार नाही. कर्नाटकमध्ये ज्या ठिकाणी मराठी भाषिक लोकं बहुसंख्येत आहे, तो भाग पुन्हा एकदा महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी महराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (17 जानेवारी) कर्नाटक– महाराष्ट्र सीमा लढ्यात आपल्या प्राणाचं बलिदान देण्याऱ्या लोकांना हुतात्मा दिनी अभिवादन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..!

कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे, हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह उद्धव ठाकरे यांनी हूतात्म्यांना विनम्र अभिवादन केलं होतं. आता उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आणि बी एस येडियुरप्पा यांनी दिलेली प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या