प्रशांत मोहिते, प्रतिनिधी नागपूर, 25 डिसेंबर : तुम्ही आजपर्यंत अनेक कराटेपट्टू बघितले असतील पण नागपूरच्या 5 वर्षीय राघव भांगडे चिमुरड्यानं कराटेमध्ये वेगळाच विश्वविक्रम रचला आहे. के.जी. 2 चा विद्यार्थी असलेल्या राघवनं सी पी बेरार शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रात्याक्षिक कार्यक्रमात हा विक्रम रचलाय.
राघवने १ मिनिटात १२५ टाईल्स फोडून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. राघवने स्वतःच्या नावे केलेला हा विक्रम बघता सर्वच थक्क झाले आहे. अडीच वर्षांचा असताना राघवला त्याच्या आई- वडिलांनी कराटे क्लासला आणले. राघवच वय लक्षता घेता त्याला प्रवेश नाकरण्यात आला मात्र, पालकांच्या आग्रहा खातर राघवला प्रवेश देण्यात आला. अगदी लहान वयापासूनच राघव निशिस्त मेहनत आणि चिकाटीने कराटे क्लासचे धडे गिरविले. कराटे शिकण्याची आवड आणि इच्छाशक्ती बघून कोच विजय गिचरे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमातून शिक्षण दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनात राघवने बरीच मेहनत घेतली. के.जी २ मध्ये शिकणाऱ्या राघवने १ मिनिटांत १२५ टाईल्स फोडले. इतक्या लहान वयात केलेली ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.