JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : नवरात्रोत्सवाची लगबग सुरू, देवीच्या मूर्ती 25 टक्क्यांनी महाग

Video : नवरात्रोत्सवाची लगबग सुरू, देवीच्या मूर्ती 25 टक्क्यांनी महाग

मूर्तिकामासाठी सिंधी मेघे परिसरात असलेल्या कुंभारवाड्यात लगबग सुरू आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याच्या सूचना मूर्तिकारांना दिलेल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा, 19 सप्टेंबर : दुर्गादेवीच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू झाली आहे. अनेक मंडळांची मूर्ती ठरविण्यापासून ते अन्य तयारीसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मूर्तिकामासाठी सिंधी मेघे परिसरात असलेल्या कुंभारवाड्यात लगबग सुरू आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याच्या सूचना मूर्तिकारांना दिलेल्या आहेत. मूर्तिकार मातीच्या मूर्ती करत असल्याने यावर्षी देवीच्या मूर्तींच्या दरात वाढ झाली आहे. भक्त लागले तयारीला नुकतीच गणेशोत्सवाची धामधूम संपली आहे. गणेशभक्त निवांत झाले असले तरी लवकरच नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. दुर्गादेवीचे भक्त तयारीला लागले आहेत. पितृ पंधरवड्यानंतर घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असतो. घटस्थापनेसोबतच दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पावसामुळे रंगकामात अडथळे मागील महिनाभरापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका मूर्तिकारांना बसला आहे. मूर्तिकाम व रंगकामात अडथळा येत आहे. सध्या मूर्तीच्या फिनिशिंग तसेच रंगकामाची लगबग सुरू आहे. मात्र, पावसामुळे मूर्तिकारांची धांदल उडत आहे. नवरात्रीत दिशेशी संबंधित या चुका करू नका, पूजा करताना हे नियम पाळा मातीमुळे लागतोय वेळ यंदा  पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्यात आल्याने यंदा नवरात्रोत्सवात केवळ मातीच्या मूर्ती साकारल्या जात आहेत. शाडू मातीच्या मूर्ती सुकण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे मागील काही महिन्यांपासूनच विविध रूपातील प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. आता या सुकलेल्या मूर्तीवर केवळ कला कुशलतेने कारागिरी करणे बाकी आहे.मूर्ती तयार झाल्यानंतर फिनिशिंग करण्यासाठी तसेच सजावट करण्यासाठी लागणारे विविध रंगरंगोटीचे साहित्य नागपूर, अमरावती, यवतमाळ तसेच वर्ध्यातून घेतले जाते. मात्र, रंगांच्या किमतीतही 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. महिलांत नवरात्रीच्या रंगांची उत्सुकता नवरात्रोत्सव म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. नवरात्रोत्सवातील देवीची उपासना, धार्मिक कार्यांपासून विसर्जनापर्यंत अनेक जबाबदाऱ्या महिला पार पाडतात. घरोघरी होणाऱ्या घटस्थापनेतही महिलाच पुढाकार घेतात. त्याचबरोबर प्रत्येक वारानुसार शुभ असलेल्या रंगाचीच साडी देवीला नेसवली जाते. रंगाचे अनुकरणही महिला करतात. त्यामुळे नवरंगातील साड्या व ड्रेस खरेदी केली जाते. नवरात्रोत्सव जवळ आल्याने महिलांमध्ये नवरंगाची उत्सुकता वाढली आहे. प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवसापासून भाविकांना पाहता येणार सप्तशृंगी देवीचे मूळ मनोहर रूप! VIDEO 25 टक्यांनी दरवाढ मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती नागपूर जिल्ह्यातील सावरगाव येथून आणावी लागते. कोरोनापूर्वी मातीचे भाव 7 हजार होते. आता मात्र ते 10 हजारांवर गेले आहे. शाडूची मातीदेखील महाग झाली आहे. गणपतीपेक्षा देवीच्या मूर्ती घडवण्यात वेळ लागतो. देवीला बरीच आभूषणे चढवली जातात. मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांना कसरत करावी लागते. कच्चा माल, रंग, माती, पीओपी, सुतळीचे दर वाढल्याने मूर्तीचे दर 25 टक्यांनी वाढले आहेत. मात्र, मूर्ती खरेदीसाठी प्रतिसाद चांगला असल्याचे मूर्तिकार सांगतात. कुशलता पणाला मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यातील तेज या गोष्टींसाठी मूर्तिकारांचे कसब कामी येत आहे. मूर्तीचे फिनिशिंग करणे, रंगरंगोटी करणे, सुशोभीकरण व अलंकारांसाठी कुंदण मोतीकाम करणे आदी कामासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. नवरात्रोत्सव सुरू होण्यास 8 दिवस उरल्याने दुर्गादेवीच्या मूर्तिकामाला वेग आला आहे. कारागीर सहकुटुंब रात्रंदिवस राबू लागले आहेत. त्यांच्या नैपुण्यामुळेच आदिशक्तीच्या विविध रूपांमध्ये जिवंतपणा येणार आहे, हे मात्र तितकेच खरे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या