वर्धा, 16 डिसेंबर : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची धान्यसाठा सुरक्षित ठेवण्याची योजना आहे. यात शेतकऱ्यांना धान्यसाठ्याची वखार पावती बँकेत तारण ठेवून कर्ज देखील उपलब्ध होते. तसेच शेतीमाल साठवणुकीसाठी 100 टक्के विमा संरक्षण देखील मिळते. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरत आहे. कसा मिळवता येतो या योजनेचा लाभ, पाहुयात. सुगी हंगामावेळी बाजारपेठेत शेतमालाची आवक जास्त होते. शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागते. अशा वेळेस कृषी मालाच्या साठवणुकीला प्राधान्य देऊन गोदामामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने शेती मालाची साठवणूक केली तर फायद्याचे ठरते. मालाची साठवण केलेल्या ठेवीची पावती बँकेकडे तारण ठेवल्यास ठेवीदारांना त्वरित कर्ज देखील उपलब्ध होते. त्याआधारे शेतकऱ्यांना हंगामात अर्थसाहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत साठवणुकीची सोय उपलब्ध होते. Wedding season : कोणत्या प्रकारच्या वरमाला यंदा आहेत ट्रेन्डिंग? पाहा Video वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकार बँक यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकरिता अभिनव ऑनलाइन तारण कर्ज योजना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना वखार पावती वरील शेतमालाच्या किमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात येते. सदर तारण कर्जाचा व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा 10 लाख प्रती शेतकरी व 75 लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनी इतकी आहे. नुकसान झाल्यास भरपाई शेतकऱ्यांनी चालू पिकाचा 7/12 उतारा दिल्यानंतर वखार भाड्यात प्रचलित साठवण दराच्या 50 टक्के सवलत देऊन 25 टक्के जागा आरक्षित करण्यात येते. याशिवाय प्रत्येक पंधरवड्यामध्ये कीड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यांनी उपचारात्मक कीटकनाशकांचा वापर करून माल सुरक्षित ठेवण्यात येतो. सर्व मालाला विमा संरक्षण दिले जाते. त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई सुद्धा देण्यात येते. अख्ख गाव करतंय गाजराची शेती, कमी कालावधीमध्ये लाखोंचं उत्पन्न Video ऑनलाइन कर्ज तत्काळ उपलब्ध महामंडळाच्या गोदामात साठवणुकीस ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखार पावतीवर ऑनलाइन कर्ज तत्काळ उपलब्ध होत असल्याने शेतकरी ठेवीदार यांची वेळेची बचत होऊन कागदपत्रासाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना माल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा, असे आवाहन मोतीराम उसेंडीसाठ अधीक्षक म.रा.वखार महामंडळ वर्धा यांनी केले आहे.