नरेंद्र मते/ वर्धा, 12 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. वर्ध्यातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांच्यावर तिरंगा बाईक रॅलीत झेंडा दाखवण्याची जबाबदारी होती. त्यांनी मात्र थेट कार्यकर्त्यांची बुलेटच हातात घेत काही अंतर गाडी चालवित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. पण ज्या सामान्य कार्यकर्त्याची गाडी चालविली तो मात्र हरखून गेला आहे. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. BJP State President : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईचा अध्यक्ष बदलण्याच्या तयारीत दोघेही फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय यावेळी ते म्हणाले की, माझ्या वाढदिवसानिमित आई वडिलांनी बुलेट गाडी याच महिन्यात एक तारखेला घेऊन दिली.
आज बाराव्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेट चालविली. ही बाब माझ्यासाठी गौरवाची आहे. त्यामुळं ही गाडी माझ्यासाठी लकी समजतोय. पुढे ते असंही म्हणाले की, माझ्या घरच्यांनी टिव्हीवर देवेंद्रजी माझी गाडी चालवीत असल्याचे पाहिले आणि त्यांनाही खूप आनंद झाला.