नांदेड, 10 नोव्हेंबर : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यातील नांदेड शहरातून जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत या यात्रेत राष्ट्रवादीचे नेतेही सामील झाले आहे. सुप्रिया सुळे यांनीही भारत जोडो यात्रेत हजेरी दर्शविली आहे. याशिवाय जयंत पाटीलदेखील यात्रेत दिसत आहे. जितेंद्र आव्हाडदेखील या सभेत दिसत आहे. गुरुद्वारेत गेल्यानंतर नेतेमंडळी यात्रेत सहभागी झाले. आजची सभा ही विशेष आहे. अशोक चव्हाणांनी या सभेसाठी जंगी तयारी केली होती. या यात्रेच्या माध्यमातून ते आपल्या मुलीचं राजकीय पदार्पण करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नांदेडमध्ये बॅनरबाजी केली जात होती. भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील हा चौथा दिवस आहे.
राहुल गांधींना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी.. नांदेडमध्येही राहुल गांधींना पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेकांना राहुल गांधींना भेटायचं आहे, त्यांच्यासोबत हस्तांदोलन करायचं आहे. यंदा या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही हजेरी दर्शवली. आणखी एक धक्का! आता डोंबिवलीतून ठाकरे गटासाठी वाईट बातमी समोर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राहूल गांधींसोबत बारा किलो मीटरचा पायी प्रवास पूर्ण केला. राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आज सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. राहूल गांधीच्या पदयात्रेत दररोज अनेक नेते सहभागी होतात. थोडं अंतर चालून नेते थांबतात. आज जयंत पाटील आणि आव्हाड देखील काही अंतर चालून थांबले. पण सुप्रिया सुळे मात्र चालत राहिल्या. यात्रेतील गर्दी पाहून त्या देखील उत्साहीत झाल्या. चालत असताना त्या कार्यकर्त्यांना हस्तांदोलन करत होत्या. सेल्फी देखिल काढत होत्या. बारा किलो मीटर चालून देखील त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवला नाही.