डॉक्टरांशी संपर्क साधा - मुलाच्या शरीराचे तापमान सतत वाढत असेल तर आपण ताबडतोब डॉक्टरांना भेटावे. तुम्हाला हवे असल्यास, जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्या. कोरोनाबाधित क्षेत्र असेल तर तुम्ही फोनवरूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वसई, 21 जानेवारी : वर्धा जिल्ह्यातील आर्वी (Aarvi Wardha) येथील गर्भपात प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईला लागून असलेल्या वसई-विरार (Vasai Virar) परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील दंतचिकित्सक असलेली महिला डॉक्टर (Woman dentist) चक्क खासगी रुग्णालयात गर्भपात केंद्र (Abortion center) चालवत असल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी महिला डॉक्टर आणि तिचा पती असे दोघेही फरार झाले आहेत. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच या महिलेच्या पतीला बोगस वैद्यकीय पदवी प्रकरणात अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार परिसरातील डॉ. आरती वाडकर या दंतचिकित्सक आहेत. मात्र, असे असतानाही त्या आपला पती सुनील वाडकर याच्या रुग्णालयात चक्क गर्भपात केंद्र चालवत होत्या. या प्रकरणात विरार पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. दोघेही पती आणि पत्नी यांनी पळ काढला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. वाचा : आर्वी गर्भपात प्रकरणात खळबळजनक माहिती उघड, डॉक्टर नीरज कदमलाही बेड्या पतीकडे बोगस वैद्यकीय पदवी डॉ. आरती वाडकरचा पती डॉ सुनील वाडकर याला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी बोगस वैद्यकीय पदवी प्रकरणात अटक केली होती. धक्कादायक म्हणजे सुनील वाडकर हा वसई विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी या पदावरही काही काळ कार्यरत होता. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने व वसई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना जाधव यांनी संयुक्त कारवाई करून विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर विरार पोलिसांनी डॉ.वाडकर यांना अटक केली होती. वाचा : आर्वी गर्भपात प्रकरणी मोठी कारवाई, डॉक्टर कदम अखेर बडतर्फ; पालिकेला बजावली नोटीस डॉ सुनील वाडकर हे वसई विरार महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी होता. सध्या तो विरार महामार्गावर ‘हायवे’ आणि नालासोपारा येथे ‘नोबेल’ अशी दोन खासगी रुग्णालये चालवतात. त्याची वैद्यकीय पदवी बोगस असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे आली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने आणि वसई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना जाधव यांनी कारवाई करत त्यााल अटक केली होती. आमच्याकडे डॉ वाडकर यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर आम्ही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेऊन तपासणी केली. त्यावेळी डॉ वाडकर यांच्याकडे एमबीबीएसची पदवी नसल्याचे समोर आले, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष चोधरी यांनी दिली होती. डॉ. वाडकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पदवी खरी आहे की खोटी याचा तपास करत असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. त्यानंतर आता पत्नीही अनधिकृतपणे गर्भपात केंद्र चालवत असल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता हे दोघेही पती आणि पत्नी यांनी पोबारा केला आहे.