JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धवसाहेब आजही हृदयात! शिंदे गटात गेलेल्या आमदाराचं 'ठाकरे प्रेम'

उद्धवसाहेब आजही हृदयात! शिंदे गटात गेलेल्या आमदाराचं 'ठाकरे प्रेम'

उद्धव ठाकरेंवरचं प्रेम काही केल्या कमी होईना…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 19 ऑगस्ट : एकीकडे राज्यभर शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंचे फोटो, बॅनर काढून टाकलेले आहेत. मात्र, दुसरीकडे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटलांनी त्यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे बॅनर अद्यापही कायम ठेवले आहेत. या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केल्यावर किशोर पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आजही आमच्या हृदयात कायम आहेत, असं मत व्यक्त केलं. पण बाळासाहेबांच्या विचारांवर उद्धव ठाकरे चालले नाहीत म्हणूनच आमच्यावर ही वेळ आली आहे, असा टोलाही यावेळी आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ठाकरे आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद आहेत, असं असताना आमदार किशोर पाटलांनी मात्र उद्धव ठाकरेंचे फोटो आपल्या कार्यालयात कायम ठेवल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार किशोर पाटील यांनी ठाकरे आजही आमच्या मनात कायम असल्याचे सांगितल्याने चर्चांना उधाण आल्याच पाहायला मिळत आहे. Shiv sena Tejas Thackeray : तेजस उद्धव ठाकरे, ठाकरे घराण्यातील युवाशक्तीचा नवा चेहरा, पोस्टर झळकले अद्याप यावर शिंदे गट किंवा ठाकरे गटातील कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान,  पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना 1 ऑगस्टला अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी न्यायालयात झाली. यासाठी राऊत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. मेधा सोमय्या यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी संजय राऊत यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचं सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या