JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेतात काम आटोपून घरी जेवायला निघाले, समोरासमोर दुचाकीच्या धडकेत 2 तरुण ठार

शेतात काम आटोपून घरी जेवायला निघाले, समोरासमोर दुचाकीच्या धडकेत 2 तरुण ठार

दोन्ही दुचाकींचा वेग हा अधिक होता. त्यामुळे अपघातात धडक झाल्यानंतर दोन्ही तरूण दूरपर्यंत फेकले गेले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मनमाड, 17 मे : ‘वेगाला आवार घाला’ अशी सूचना नेहमी वाहतूक पोलिसांकडून  दिले जाते. परंतु, वाहतुकीचे नियम जर पाळले नाही तर त्याची किंमत चुकवावी लागते. मनमाडजवळील सटाण्यात भरधाव वेगात जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन तरूण ठार झाले आहे. सटाणा शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या रावळगाव फाट्याजवळ शनिवारी 16 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला. तर दुसऱ्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादम्यान मृत्यू  झाला. या अपघातात ललित  सोनवणे (वय 26, राहणार सटाणा ) आणि अतुल सोनवणे (वय 23, राहणार ब्राह्मणगाव) या दोघांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा-  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात मिनी बसचा चक्काचूर, 5 जण गंभीर ललित सोनवणे हा शेतात काम करण्यासाठी गेला होता. दिवसभर शेतात काम केल्यानंतर रात्री तो घराकडे निघाला होता. शेतापासून काही अंतरावर पोहोचताच समोर येणाऱ्या एका भरधाव दुचाकीने समोरासमोर जोरात धडक दिली. दोन्ही दुचाकींचा वेग हा अधिक होता. त्यामुळे अपघातात धडक झाल्यानंतर दोन्ही तरूण दूरपर्यंत फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही दुचाकीचा समोरचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तर अतुल सोनवणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हेही वाचा-  मान्सून आला रे! अंदमानच्या वेशीवर दाखल, महाराष्ट्रातही कधी येणार? तर ललित सोनवणे हा गंभीर जखमी झाला होता. स्थानिक गावकऱ्यांनी या ललितला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं. परंतु, उपचार सुरू असताना मध्यरात्री ललितचा मृत्यू झाला. शेतात काम करणारी दोन्ही तरुण मुलं अपघातात गमावल्यामुळे दोन्ही तरुणाच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या