JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राष्ट्रवादीची युवती प्रमुख कार्यकर्ती निघाली 'बबली', मित्रांच्या मदतीने चोरल्या 11 गाड्या!

राष्ट्रवादीची युवती प्रमुख कार्यकर्ती निघाली 'बबली', मित्रांच्या मदतीने चोरल्या 11 गाड्या!

तिचे दोन साथीदार विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती.

जाहिरात

तिचे दोन साथीदार विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 15 नोव्हेंबर : कोरोनामुळे (corona) लांबलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे चंद्रपूरमध्ये (chandrapur) मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचा (ncp party worker) धक्कादायक चेहरासमोर आला आहे. या तरुण कार्यकर्तीला आणि तिच्या साथीदारांना  मोपेड चोरीचा प्रकरणात अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती प्रमुख असलेल्या तरुणीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.वैष्णवी देवतळे (Vaishnavi Devtale) असे या युवती प्रमुख कार्यकर्तीचे नाव आहे. आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ती बाईक चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. तिचे दोन साथीदार विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेले वाहन सोडून जाणाऱ्या वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे. नेमकी संधी साधून मोपेड चोरी करत होते. त्यानंतर त्या मोपेडला दूरवर पर्यंत ढकलत नेण्यात येत होतं. हे काय? कंगनाच्या वक्तव्यामुळे राखी सावंतला मोठा धक्का; हॉस्पिटलमध्ये झाली दाखल निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर मेकॅनिक साथीदाराच्या सहाय्याने गाडी सुरू केली जात होती. तिथून मोपेड आपल्या राहत्या ठिकाणी आणत होते. मोपेड चोरी केल्यानंतर तिची विक्री केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. एकूण 11 मोपेड वाहने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीकडून जप्त केली आहेत. सुपरस्टार छोटे उस्तादचं सूत्रसंचालन करणारी अवनी जोशी आहे तरी कोण? या टोळीकडून अन्य काही ठिकाणाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीसह मनीष पाल, सौरभ चंदनखेडे अशा तीनही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या