JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'सुशांतच्या हत्येनंतर मिलिंद नार्वेकरांच्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांचा दोनवेळा कॉल', नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

'सुशांतच्या हत्येनंतर मिलिंद नार्वेकरांच्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांचा दोनवेळा कॉल', नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर शिवसेना सचिव मलिंद नार्वेकरांच्या फोनवरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा कॉल केला होता, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 फेब्रुवारी : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) प्रचंड टीका केली होती. विशेष म्हणजे त्याच प्रकरणावरुन नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला (Shiv Sena) ट्विटरवर इशारा दिला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर शिवसेना सचिव मलिंद नार्वेकरांच्या (Milind Narvekar) फोनवरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोनवेळा कॉल केला होता, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. पण नारायण राणे यांनी त्यापलीकडे फारसं काही बोलण्यास टाळलं आहे. तसेच त्यांनी नार्वेकरांना उद्देशून शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. नेमकं प्रकरण काय? खरंतर भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे सचिव मलिंद नार्वेकर यांच्यात ट्विटरवॉर सुरु असल्याचं चित्र आहे. राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकर यांचा ‘मातोश्री’मधील ‘बॉय’ असा उल्लेख केला होता. तसेच कोण मिलिंद नार्वेकर? असा सवाल करत खिल्ली उडवली होती. त्यांच्या या टीकेला मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर उत्तर दिलं होतं. स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? असा खोचक सवाल नार्वेकरांनी केला होता. त्यांच्या या सवालावर नारायण राणेंनी ट्विटरवर प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणेंचा इशारा नेमका काय? “सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू? मला बोलायला लावू नका”, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

नारायण राणे पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले? शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde), सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) उपस्थित नव्हते. याबाबत पत्रकारांनी राणेंना प्रश्न विचारला असता त्यांनी “मिलिंद नार्वेकर कोण? ते ‘मातोश्री’मध्ये बॉयचं काम करायचे ते का?”, असे उलट सवाल केले. ( … म्हणून हॉस्टेलच्या महिला अधीक्षकांनी मुलींचं केलं मुंडण, धक्कादायक आहे कारण ) “कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो, माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर, काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी खिल्ली उडवली होती. मिलिंद नार्वेकरांचं उत्तर नेमकं काय? मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या स्वत:च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नारायण राणे यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?”, असा सवाल करत नार्वेकरांनीदेखील नारायण राणे यांना टोला लगावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या