JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / झुडपात दडून बसलेल्या वाघाचा गाईवर हल्ला, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील LIVE VIDEO

झुडपात दडून बसलेल्या वाघाचा गाईवर हल्ला, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील LIVE VIDEO

Tiger attack live video: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात वाघाने गाईवर हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जाहिरात

झुडपात दडून बसलेल्या वाघाने गाईवर केला हल्ला आणि मग..., पाहा शिकारीचा LIVE VIDEO

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 11 नोव्हेंबर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात गाईवर वाघाने (tiger attack on cow) हल्ला केलयाचा व्हिडिओ व्हायरल (tiger attack video goes viral) झाला आहे. चंद्रपूर शहरालगत पद्मापूर ते मोहर्ली मार्गावर ही घटना घडली. या मार्गावरून कारने ताडोबाकडे जाणाऱ्या एका कुटुंबाने ही दृश्ये आपल्या कॅमेर्‍यात कैद केली आहेत. अत्यंत चपळाईने वाघाने गाईला जखमी करत शिकार साधल्याचे व्हिडीओत दिसत आहे. (Tiger attack on cow live video)

रस्त्याच्या अगदी कडेला झालेल्या या थराराने ताडोबाकडे निघाले पर्यटक क्षणभर थबकलेच. जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांच्या सीमावर्ती भागात कित्येकदा अशा घटना घडतात. मात्र हा थरार लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून त्याची चर्चाही होत आहे.

सोशल मीडियात हे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून त्यावर अनेक कमेंट्स सुद्धा नेटकऱ्यांच्या येत आहेत. दरम्यान या परिसरात वाघ, बिबट्यांकडून शेळी, पाळीव प्राण्यांवर अशा प्रकारचे हल्ले सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. चंद्रपुरात वाघिणीचा मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना उगडकीस आली आहे. चंदनखेडा-वायगाव रोडवरील एका शेतात वाघिणीचा मृतदेह आढळला आहे. मयत वाघीण अंदाजे 3 वर्षांची असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाघिणीचा मृत्यू शेतातील कुंपणात लावलेल्या करंटमुळे झाल्याची शक्यता आहे. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मुंगसासोबतच्या तुंबळ लढाईत गंभीर जखमी झाला कोब्रा जोधपूरमधील एका ठिकाणाहून रेस्क्यू केल्या गेलेल्या किंग कोब्राच्या जबड्याला जखम झाली आहे. यामुळे त्याला काही खाणं-पिणंही शक्य होत नाहीये. किंग कोब्राला रेस्क्यू करणाऱ्या व्यक्तीनं आपल्या घरीच डॉक्टरांचा सल्ला घेत या सापावर प्राथमिक उपचार केले. या व्यक्तीनं दोन दिवसाआधी जोधपूरच्या नांदडी परिसरातील एका घरातून पाच फूट लांब कोब्राला रेस्क्यू केलं. जेव्हा त्यानं कोब्राला पाहिलं तेव्हा त्याचा जबडा भरपूर जखमी झाला होता. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार मुंगसासोबतच्या भांडणात कोब्राला मार लागल्याची शक्यता आहे. 5 वाघांना एका कुत्र्याने शिकवला धडा सोशल मीडियावरच्या काही व्हिडिओमधील प्रसंग खरे आहेत की खोटे हेदेखील पाहणं गरजेचं असतं. कारण लाइक्स, कमेंट्स मिळवण्यासाठी काही व्हिडिओ एडिटिंग तंत्राचा वापर करून रोमांचक बनवण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढल्याचं दिसून येतं. अर्थात हे व्हिडिओ फेक असल्याचं कालांतरानं स्पष्ट होतं; पण काही कालावधीसाठी का होईना असे व्हिडिओ चर्चेत येतात हे नक्की. एक कुत्रा काही वाघांशी लढतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. नदीत डुंबत असलेल्या वाघांवरून हा कुत्रा उडी मारताना या व्हिडिओत दिसत आहे. ज्या युझर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे, त्या प्रत्येकानं आश्चर्य व्यक्त केलं आहे. परंतु, आश्चर्यकारक गोष्ट अशी की शेअर करण्यात आलेला व्हिडिओ प्रत्यक्षात खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या