JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हृदयद्रावक घटना! कुलरचा शॉक लागून तीन बहिणींनी जागेवरच सोडला जीव

हृदयद्रावक घटना! कुलरचा शॉक लागून तीन बहिणींनी जागेवरच सोडला जीव

तिन्ही बहिणी गुरुवारी सकाळी घरात जेवण करीत होत्या. त्या दरम्यान तीन मुलींपैकी एक जण कुलर सुरू करण्यास गेली…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 30 जुलै: कुलरचा शॉक लागून तीन लहान बहिणींचा जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर (कोदुरली) येथे गुरुवारी सकाळी आठ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे हेही वाचा.. भारुडात करायचा ‘स्त्री’ भूमिका! चिडवायची मुलगी, ‘कंचना’ सिनेमा पाहून केली हत्या रिया गजानन भुसेवार (वय-6), मोनिका गजानन भुसेवार (वय-4) आणि मोंटी गजानन भुसेवार (वय-2) अशी मृत मुलींची नावं आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास सुरू आहे. मिळालेली माहिती अशी की, तिन्ही बहिणी गुरुवारी सकाळी घरात जेवण करीत होत्या. त्या दरम्यान तीन मुलींपैकी एक जण कुलर सुरू करण्यास गेली तर तिथेच ती शॉक लागून अडकली. तिला काढण्यासाठी दुसरी मुलगी गेली तर तिला सुद्धा शॉक लागला. नंतर तिसरी मुलगी आपल्या बहिणीला काढायला गेली तर तिलाही शॉक बसला. तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. हेही वाचा.. गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची बोटचेपी भूमिका का? भाजप नेत्याचा रोखठोक सवाल घटना घडली तेव्हा तिन्ही बहिणी घरात एकट्याच होत्या. मुलींचे आई-वडील शेतात गेले होते. घरात कोणीही नसल्यामुळे तिन्ही बहिणींचे मृतदेह घरातच पडून होते. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच तहलीलदार डॉ. रवींद्र कानडजे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सध्या पावसाळा सुरू आहे. मात्र, अजून काही भागात समाधानकारक पाऊल झाला नाही. त्यामुळे अजूनही उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे कुलरचा वापर सुरूच आहे. यातच ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या