वडील पांडुरंग वाडकर यांच्या स्वप्नात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले आणि त्यांनी तुझ्या घरात शिवसेना आल्याचं सांगितलं.
डोंबिवली, 22 जानेवारी : शिवसेना कुणाची ? यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पण, डोंबिवलीमध्ये एका कुटुंबीयांनी आपल्या लेकीचं नाव हे चक्क ‘शिवसेना’ ठेवलं आहे. जन्मताच लेकीचं नाव शिवसेना ठेवल्यामुळे डोंबिवलीतील वाडकर कुटुंबीयांची एकच चर्चा रंगली आहे. डोंबिवलीतील एका कुटुंबाने आपल्या मुलीचं नाव चक्क " शिवसेना ठेवलं आहे. पांडुरंग आणि नीलम वाडकर या दाम्पत्याच्या घरात मुलगी जन्माला आली. त्यांनी आपल्या लेकीचं नाव हे शिवसेना उर्फ कृष्णाली वाडकर असं ठेवलं आहे. 17 ऑक्टोबर 2022 ला रायगड जिल्ह्यातील किये गावात या चिमुकलीचा जन्म झाला. (आम्ही दुखी आणि व्यथित, मुलाच्या निलंबनावर पहिल्यांदाच सुधीर तांबे बोलले) मात्र शिवसेनेवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि कट्टर कार्यकर्ता असलेल्या चिमुकलीचे वडील पांडुरंग वाडकर यांनी सांगितलं की, माझ्याा स्वप्नात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते आणि त्यांनी तुझ्या घरात शिवसेना आल्याचं सांगितलं. त्यानंतर अवघ्या एका दिवसांने पांडुरंग आणि नीलम यांना कन्यारत्न झाले. मात्र यावेळी पांडुरंग यांना पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली. मग त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलीचे नाव ‘शिवसेना’ ठेवायचा निर्णय घेतला. (‘त्या’ पक्षांचा कार्यक्रम झाला आता शिंदे गट…; रोहित पवारांचा भाजपला खोचक टोला) आपल्या पक्षाचे नाव लेकीला ठेवल्यामुळे कोण काय म्हणतील याचा त्यांनी विचार केला नाही. त्यांचा हा निर्णय पत्नी नीलमला देखील सांगितला. तिने देखील त्याला होकार दिला. अखेर गावी मोठा बारसा साजरा करीत चिमुकलीचे नाव “शिवसेना"ठेवलं. सध्या सुरू असलेल्या राजकारणाने दुःख होतं, मात्र मुलीचं नाव शिवसेना ठेवल्या आनंद होतोय. येत्या 23 जानेवारी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी स्मृतिस्थळी जाऊन त्याठिकाणी महाड येथे बाळासाहेबांचे मंदिर बांधण्याची घोषणा करणार असल्याचंही पांडुरंग यांनी सांगितलं.