अहमदनगर - कर्जत नगरपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांनी एक हाती सत्ता आणली तर दुसरीकडे सांगलीमध्ये रोहित पाटील याने 10 जागा जिंकून आणल्या .
कर्जत, 19 जानेवारी : नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाले आहे. राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. सांगलीमध्ये रोहित पाटील (rohit patil) यांनी एकहाती सत्ता राखली आहे. त्यामुळे रोहित सारख्या युवकांना पक्षाने संधी दिली पाहिजे, अशी मागणीच आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी केली आहे. अहमदनगर - कर्जत नगरपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांनी एक हाती सत्ता आणली आहे. तर दुसरीकडे सांगलीमध्ये दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या मुलगा रोहित पाटील याने एकहाती 10 जागा जिंकून आणल्या आहे. रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ( Climate change: बदलत्या परिस्थितीनुसार माणूस जुळवून घेतोय का? ) ‘रोहित पाटील यांच्यासारख्या युवकांनी चांगली काम केले आहे अशा लोकांना पक्षाने संधी दिली पाहिजे असे माझे व्यक्तीगत मत आहे’, असं म्हणत पवार यांनी नवी मागणीच केली आहे. ‘तर राज्यात अनेक नगर पंचायत समिती समितीवर आघाडीची सत्ता असेल भाजपाने भाजपाने मी स्ट्राईक रेट वर बोलते मात्र येणाऱ्या काळात अनेक ठिकाणी सत्ता ही आघाडीची असेल, असंही रोहित पवार म्हणाले. महाविकास आघाडीने 1300 पेक्षा जास्त जागा जिंकल्या - जयंत पाटील दरम्यान, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाले आहे. राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. 354 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आहे महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा मिळून 1300 च्यावर निवडून आल्यात. यावरून महाविकास आघाडीची ताकद दिसून येतंय, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ( किंग कोहलीने कॅप्टन्सी जाताच मोडला सचिनचा ‘महारेकॉर्ड’, पॉण्टिंगही पडला मागे ) ‘काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्याही जागा चांगल्या निवडून आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतिशय चांगल्या जागा निवडून आलेल्या आहेत. 354 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आहे. महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा मिळून 1300 च्यावर निवडून आल्यात. या निकालाने एक गोष्ट स्पष्ट दिसून आलीय जर तीनही पक्ष एकत्र येऊन लढले तर नक्कीच भाजपला थोपवू शकतात हे याआधीही स्पष्ट झालं आज पुन्हा जाणवलं, असंही पाटील म्हणाले. कवठेमहाकाळमध्ये रोहित पाटलांनी चांगली मेहनत घेतली आणि त्याला यश मिळालं त्यांचं कौतुक आणि अभिनंदन आहे, असंही पाटील म्हणाले. भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसचं शह देऊ शकते हे वारंवार दिसून आलंय. चंद्रकांतदादा ज्या ज्या ठिकाणी जातात तिथले अनुभव पाहता त्यांना किती यश मिळत हे त्यांनी पाहावं. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात म्हणून नाही तर तिथे एकत्र निवडणूक लढवली आणि तिथे चांगलं यश मिळालं. तिथे कार्यकर्त्ययानी खूप मेहनत घेतली, असंही पाटील म्हणाले.