JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आईने रागवलं अन् दुसऱ्या दिवशी सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा आढळला विहिरीत मृतदेह, दापोलीमध्ये खळबळ

आईने रागवलं अन् दुसऱ्या दिवशी सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा आढळला विहिरीत मृतदेह, दापोलीमध्ये खळबळ

तिचा मृत्यू हा घातपात आहे की आत्महत्या या चर्चेला उधाण आले आहे.

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दापोली, 23 मे : दापोली (dapoli) तालुक्यातील आंबवली गावातील इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलीचा मृतदेह विहिरीत (Suicide of 13 year old girl) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू हा घातपात आहे की आत्महत्या या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियशी राऊत असं मृत मुलीचे नाव आहे. गावाशेजारील विहिरीत नियशीचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. परंतु ही मुलगी विहिरीमध्ये कशी पडली, विहिरीकडे नेमकी कशासाठी गेली होती असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. तिच्या पायातील दोन्ही चप्पल विहिरीमध्ये तरंगताना आढळून आल्या आहेत. त्यामुळे ती अचानक तोल जाऊन पडली की तिला अन्य कोणीतरी विहिरीत ढकलले हे पोलीस तपासातून पुढे येईल. ( भारतीय क्रिकेटपटूनेच दिला ऋषभ पंतला धोका, दीड कोटी रुपयांना लुटलं! ) नियशी आपल्या आईसोबत घरी राहत होती तर वडील कामानिमित्त मुंबई येथे असतात. असे कळले असून रविवारी नियशी अचानक दिसेनाशी झाली. शोधाशोध केल्यावर तिचा मृतदेह आज विहिरीत आढळून आला. ( मुंबईत आता फक्त ईलेक्ट्रिक BEST बसेसच धावणार, 2100 नव्या गाड्या वर्षभरात दाखल! ) दापोली उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले असून अहवाल आल्यानंतर तिचा मृत्यू कसा झाला याचा शोध लागेल. दरम्यान, खेकडे पकडायला नेण्यावरून तिला ओरडण्याचा राग मनात धरून तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद तिची आई नंदिनी राऊत यांनी दिली आहे आहे. दापोली पोलीस स्थानकात दिली आहे. परंतु तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या