JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कारचा दरवाजा उघडला अन् दुचाकीस्वार खाली पडला, टेम्पोने रामला चिरडले, LIVE VIDEO

कारचा दरवाजा उघडला अन् दुचाकीस्वार खाली पडला, टेम्पोने रामला चिरडले, LIVE VIDEO

राम बागल आणि त्याचा मित्र दुचाकीवरून विरुद्ध दिशेनं जात होता. त्याचवेळी रस्त्यात एक कार उभी होती.

जाहिरात

राम बागल आणि त्याचा मित्र दुचाकीवरून विरुद्ध दिशेनं जात होता. त्याचवेळी रस्त्यात एक कार उभी होती.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 15 नोव्हेंबर : चालकांच्या चुकीमुळे घडणाऱ्या अपघाताच्या (accident) काही घटना काळजाचा थरकाप उडविणाऱ्या असतात अशीच एक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (pimpari chinchvad) घडली आहे. कार चालकाने अचानक दार उघडल्यामुळे दुचाकीस्वार खाली पडले आणि तितक्यात ट्रकने एकाला चिरडले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (cctv video) व्हायरल झाला आहे. आळंदी -दिघी रोडवर ही घटना घडली आहे. घडलेल्या या भीषण अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव राम बाळासाहेब बागल असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

राम बागल आणि त्याचा मित्र दुचाकीवरून विरुद्ध दिशेनं जात होता. त्याचवेळी रस्त्यात एक कार उभी होती. जेव्हा दोघे जण कारजवळ पोहोचले तेव्हा कारचालकाने अचानक दार उघडले. दाराचा धक्का लागल्यामुळे राम बागल दुचाकीसह खाली कोसळले. त्याचवेळी वाहतुकीचे नियम मोडून वाहनांना ओव्हरटेक करत समोरून एक टेम्पो आला. आणि टेम्पोखाली राम बागल चिरडला गेला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. Shocking! लग्नाच्या तयारीदरम्यानच प्रेमी युगुलाने घेतला शेवटचा श्वास दरम्यान, या अपघातासाठी कारणीभूत ठरल्या प्रकरणी  विरुद्ध दिशेने जाणारा दुचाकीस्वार, विरुद्ध दिशेला कार पार्क करणारा कार चालक आणि कारचा दरवाजा उघडणारा प्रवासी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसंच, वाहतुकीचे नियम मोडून भरधाव वेगाने वाहन चालवणारा टेम्पोचालकाविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या