JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खाकीतील 'दानवा'चं क्रूर कृत्य, गोरगरिबांना मदत करणाऱ्या युवकांना अमानुष मारहाण

खाकीतील 'दानवा'चं क्रूर कृत्य, गोरगरिबांना मदत करणाऱ्या युवकांना अमानुष मारहाण

एकीकडे खाकी वर्दीतील देवाचे दर्शन सर्वत्र होत आहे. तर ठाण्यात खाकीतील ‘दानवा’चं क्रूर कृत्य समोर आलं आहे.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 25 एप्रिल: कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एकीकडे खाकी वर्दीतील देवाचे दर्शन सर्वत्र होत आहे. तर ठाण्यात खाकीतील ‘दानवा’चं क्रूर कृत्य समोर आलं आहे. कोरोनाचा सर्वत्र हाहाकार सुरु असतानाच अनेक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते गोरगरिबांच्या मदतीला धावून आले आहेत. हातावर पोट असलेल्या हजारो नागरिकांना दररोज जेवण दिलं जात आहे. हेच सत्कर्म करणाऱ्या दोन युवकांना दिवा येथे पोलिसांनी अमानुष मारहाण केलाचा निंदनीय प्रकार घडला आहे. हेही वाचा.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत ‘या’ राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश कायम काही कामानिमित्त दिवा पोलिस चौकीसमोर उभे असलेल्या पीडित अमोल केंद्रे आणि प्रवीण निकम यांना काठीने बेदम मारहाण केली. मारहाण करत याबाबत वाच्यता कुठे केली तर घरातून फरपटत आणून आणखी गंभीर कलमे लावण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील अमोल केंद्रे या तरुणानं केला आहे. या गंभीर घटनेची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहखात्यासह पोलीस आयुक्तांना केली आहे. हेही वाचा.. प्रेयसीने खेळला प्रेमाचा डबल गेम, रंगे हात पाहिल्यावर प्रियकराने केला खेळ खल्लास अन्यथा उपोषणाला बसणार अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पीडित युवकांनी केली आहे. अन्यथा युवकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. युवक आपल्या राहत्या घरी उपोषणास बसणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, एकीकडे रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची तुलना देवाशी केली जात आहे. मात्र, ठाणे पोलिसांच्या या कृत्याने खाकीत काही दानव समाजात फिरत आहेत, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. ठाणे पोलिसांच्या या कृतीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी जोर धरत आहे. संपादन- संदीप पारोळेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या