JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उदयनराजे यांचे अश्रू म्हणजे...; संजय राऊतांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

उदयनराजे यांचे अश्रू म्हणजे...; संजय राऊतांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील हल्लाबोल केला.

जाहिरात

संजय राऊत

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील हल्लाबोल केला. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा अपमान केला. कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची हकालपट्टी होणं गरजेचं होतं. मात्र राज्यापालांवर अजूनही कारवाई झाली नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंची ही चुप्पी असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. नेमकं काय म्हणाले राऊत?  संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवरायांच्या अपमानानंतर कोश्यारींची हकालपट्टी व्हायला हवी होती. कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मात्र अजूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची  ही चुप्पी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले. उदयनराजे यांचे अश्रू म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे अश्रू  आहेत.  त्यामुळे प्रताप गडावर जाऊन शिवरायांना वंदन करण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. कार्यक्रम साताऱ्यात आहे, मात्र अजूनही उदयनराजे तिकडे गेले नसल्याचही राऊतांनी यावेळी म्हटलं. हेही वाचा :   ईडीच्या याचिकेवर संजय राऊतांचे न्यायालयात शपथपत्र; भाजप, शिंदे गटावर गंभीर आरोप राऊतांचे न्यायालयात शपथपत्र  दरम्यान दुसरीकडे संजय राऊत यांनी ईडीच्या याचिकेवर न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे. या शपथपत्रात त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.  राज्यात बदललेल्या परिस्थितीनंतर मला अटक करण्यात आली. राजकीय शत्रुत्त्वामुळे मला अटक करण्यात आली. घोटाळ्याचा कोणताही पुरावा नसताना अटक झाल्याचं राऊत यांनी आपल्या शपथपत्रात म्हटलं  आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या