JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Tejas Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मुलाचा तामिळनाडूमध्ये डंका, तेजस ठाकरेंकडून पालींच्या नव्या प्रजातींचा शोध

Tejas Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मुलाचा तामिळनाडूमध्ये डंका, तेजस ठाकरेंकडून पालींच्या नव्या प्रजातींचा शोध

तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमकडून या पालींचे संशोधन तामीळनाडूतील पर्वतरांगामध्ये काम सुरू होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 डिसेंबर : उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजस ठाकरे यांनी पालीच्या नवीन प्रजातींचे संशोधन लावले आहे. तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमकडून या पालींचे संशोधन तामीळनाडूतील पर्वतरांगामध्ये काम सुरू होते. तामीळनाडूतील येरकाड, कोल्ली आणि सिरुमलाई हे पर्वत शेव्हरॉय या पर्वतरांगेचे भाग आहेत. शेव्हरॉय पर्वतरांग ही पश्चिम घाटापासून तुटलेली स्वतंत्र पर्वतरांग आहे. त्या पर्वतरांगांमध्ये या पाच नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे.

दरम्यान निमास्पिस कुळातील प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. तेजस ठाकरे, ईशान आगरवाल आणि अक्षय खांडेकर यांच्या टीमने नव्या पालींच्या प्रजातींचे संशोधन केले आहे. या पाचही प्रजाती विशिष्ट उंची आणि विशिष्ट डोंगरउतार सोडून इतरत्र आढळत नसल्याची माहिती देण्यात आली.

हे ही वाचा :  चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीकडून 51 हजारांचं बक्षीस!

संबंधित बातम्या

‘निमास्पिस सलिम अली’, ‘निमास्पीस रुधीरा येरकाड’, आगाईगंगा’, ‘निमास्पिस फंटास्टिका’, ‘निमास्पिस पचमलाएनसीस’ या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. याचे संशोधन ‘गिकॉस ऑफ पेनिन्सुलर इंडिया’ या प्रकल्पांतर्गत तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन’च्या टीमने हे काम केले आहे. संशोधकांच्या या नव्या शोधामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने तामीळनाडूतील पर्वतरांगांचे महत्व वाढले आहे.

‘निमास्पिस सलिम अली’ या प्रजातीचे नामकरण डॉ. सलीम अली यांच्या नावावरुन करण्यात आले आहे.  तर ‘निमास्पीस रुधीरा येरकाड’ ही प्रजाती 1100 मीटर उंचीवर आढळते. तिच्या वैशिष्टयपूर्ण रंगावरुन तिचे नामकरण रुधीरा (रक्त) असे करण्यात आले आहे. तिसरी प्रजाती आगाईगंगा धबधब्याजवळ ती प्रथम आढळून आली म्हणून तिचे नामकरण ‘निमास्पिस आगाईगंगा’ असे करण्यात आले आहे.

जाहिरात

चौथी ‘निमास्पिस फंटास्टिका’ ही प्रजाती कोल्ली पर्वताच्या पश्चिम उताराच्या मध्यउंचीवर आढळून येते. या प्रजातीच्या पालीचा रंग वैशिष्टय़पूर्ण असतो. त्यामुळे तिचे नामकरण ‘फंटास्टिका’ या ग्रीक शब्दावरून करण्यात आले आहे. ‘निमास्पिस पचमलाएनसीस’ या प्रजातीचे नामकरण पचमलाई या पर्वतावरुन केले आहे.

या प्रजाती 30 ते 35 मिलीमीटर लांबीच्या आहेत. या प्रजातीच्या नराचे रंग भडक तर माद्या या फिकट रंगाच्या असतात. दिवसा सक्रिय असणाऱ्या या पाली मुख्यत्वे दगडांवरती आढळतात. छोटे किडे आणि मुंग्या हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  हल्ला प्रिप्लॅन, शाई कुणी फेकली? चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट

आदित्य ठाकरेंकडून कौतुक

आदित्य ठाकरे यांनी या शोधाबद्दल लहान भाऊ तेजस ठाकरे यांचे कौतुक केले आहे. ‘माझा भाऊ तेजस याचा मला अभिमान आहे. वन्यजीव संरक्षण आणि संशोधन हे त्याचे पॅशन आहे. त्याने त्याच्या संशोधन प्रकल्पांतर्गत आपल्या टीमबरोबर तामीळनाडूत संशोधन करून पालींच्या पाच नव्या प्रजाती शोधून काढल्या. ’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या