JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात 'सिम्बॉयसिस'च्या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थिनीची वसतीगृहातच आत्महत्या

पुण्यात 'सिम्बॉयसिस'च्या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थिनीची वसतीगृहातच आत्महत्या

पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनीने वसतीगृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे/गडचिरोली, 3 एप्रिल: पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनीने वसतीगृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. समिधा कालीदास राऊत (वय-20) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. समिधा हिचा मृतदेह गुरुवारी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. मिळालेली माहिती अशी की, समिधा राऊत ही गडचिरोली येथील मूळ रहिवासी होती. हिवताप विभागात कार्यरत कालीदास राऊत यांची कन्या तर ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांची ती पुतणी होत. समिधा पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षात शिकत होती. सिम्बॉयसिस गर्ल्स होस्टेल, ( विमाननगर, पुणे) रोहिल मिथील इमारतीच्या खोलीत ती राहत होती. हेही वाचा…. धक्कादायक: सात नराधमांकडून मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार, पीडिता गरोदर एक एप्रिलच्या रात्री दैनंदिन हजेरीच्या वेळी समिधा उपस्थित नव्हती. तिच्या खोलीचे दार बंद असल्याने वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने बाल्कनीच्या बाजूला असलेल्या पॅनलमधून खोलीत प्रवेश केला. तेव्हा समिधा खोलीतील पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी तिला खाली उतरवले. त्यानंतर डॉक्टर व पोलिसांना पाचारण केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. हेही वाचा…. हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का मारलेले तबलिगी जमातचे 10 जण पुणे जिल्ह्यातून फरार पोलिसांनी समिधाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. समिधा राऊत ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तिचा मृत्युबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या