पदावर असताना अनियमितता आरोपाखाली देशपांडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
शिवाजी गोरे, प्रतिनिधी दापोली, 24 जानेवारी : सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडी आणि तपास यंत्रणाचा ससेमिरा कायम आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी दापोलीतील तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचं निलंबन करण्यात आले असून चौकशीही होणार आहे. ( मंत्रिमंडळ विस्ताराचा दिल्लीत निघणार तोडगा? शिंदे-फडणवीस शहांच्या भेटीला ) वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणामुळे अनिल परब यांच्यावर दररोज भाजपचे नेते किरीट सोमय्या हे नव नवीन आरोप करत असतात. आता याच प्रकरणात तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना निलंबनाला सामोरं जावं लागलं आहे. पदावर असताना अनियमितता आरोपाखाली देशपांडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट N A ऑर्डर आधी रद्द केली आता तत्कालीन प्रांत अधिकारी जयराम देशपांडे यांचं निलंबन केलं आहे. (‘बाळासाहेबांनी दाखवलेल्या विश्वासाचा अपमान करू नका’, तैलचित्रकार चंद्रकला कदम नाराज, Video) दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी N/A परवानगी दिलेल्या तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना निलंबित करण्यात आल्याने साई रिसॉर्ट प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. तसंच त्यांच्याच कालावधीत आणखी काही रिसॉर्ट N/A ऑर्डर मध्ये अनियमितता आढळून आल्याने या पूर्वीच त्यांची परवानगी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.