JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राऊतांच्या मैत्री बंगल्यात सकाळपासून काय-काय घडलं? सुनील राऊतांनी सांगितला घटनाक्रम

राऊतांच्या मैत्री बंगल्यात सकाळपासून काय-काय घडलं? सुनील राऊतांनी सांगितला घटनाक्रम

सकाळपासून ईडीने नेमकी काय-काय कारवाई केली याबाबतची माहिती संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी ‘न्यजू 18 लोकमत’ला प्रतिक्रिया देताना दिली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जुलै : शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. ईडी अधिकारी आज सकाळपासून संजय राऊतांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी दाखल झाले होते. ईडी अधिकाऱ्यांकडून संजय राऊतांची कसून चौकशी सुरु होती. तसेच कुटुंबियांची चौकशी केली गेली. यावेळी संपूर्ण बंगल्याची झडती घेण्यात आली. सकाळपासून ईडीने नेमकी काय-काय कारवाई केली याबाबतची माहिती संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी ‘न्यजू 18 लोकमत’ला प्रतिक्रिया देताना दिली. सुनील राऊत हे देखील संजय राऊत यांच्यासोबत आज दिवसभर मैत्री बंगल्यात होते. सुनील राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांनी आज संजय राऊत यांच्या संपूर्ण घराची झडती घेतली. घरात असलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि काही कागदपत्रे सोबत नेले. विशेष म्हणजे ईडीचं एक पथक राऊतांच्या मुलीला घेवून त्यांच्या दादर येथील निवावस्थानी गेलं. तिथेदेखील अनेक तास अधिकाऱ्यांकडून झडती घेण्याचं काम सुरु होतं. पण ईडी अधिकाऱ्यांनी सोबत नेलेले कागदपत्रे हे काहीच कामाचे नाहीत. ईडी अधिकाऱ्यांना पत्राचाळ संबंधित कोणतेही कागदपत्रे आणि पुरावे मिळाले नाही, अशी माहिती सुनील राऊतांनी दिली. ( सर्वात मोठी बातमी, सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात ) “ज्याप्रकारे संजय राऊतांना समन्स बजावण्यात आलं होतं त्याप्रकारे त्यांना पत्राचाळीबद्दल एकही डॉक्यूमेंट मिळालेलं नाही. त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली. पण त्यांना एकही डॉक्यूमेंट मिळाली नाहीत. जे बेकार डॉक्यमेंट्स आहेत ते घेवून निघाले आहेत. त्याबद्दलची माहिती आम्ही राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे. तेच डॉक्यूमेंट घेवून ते निघाले आहेत”, अशी प्रतिक्रिया सुनील राऊतांनी दिली. “अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, आम्ही तुमची एक स्टेटमेंट घेवू. त्यासाठी त्यांना घेवून ते ईडी कार्यालयात गेले आहेत. मैत्री बंगल्यात आम्ही सगळे राहत असल्याने आमच्या कुटुंबातील सर्वांचे त्यांनी डॉक्यूमेंट चेक केले”, अशी माहिती सुनील राऊतांनी दिली. “आमची पुढची भूमिका अशीच आहे की, जरी चुकीच्या कारवाईमुळे राऊतांना अटक झाली, फासावर जरी लटकवलं तरी राऊत शिवसेना सोडणार नाही. उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण महाराष्ट्र संजय राऊतांसोबत आहे. राऊत लढा जिंकणारच”, असा दावा सुनील राऊतांनी केला. “कार्यकर्ता हा शिवसेनेवर प्रेम करणारा आहे. त्यामुळे त्यांच्या नेत्यावर कारवाई केल्याने कार्यकर्ता बेभान होतो. कार्यकर्ते सकाळी सात वाजेपासून न खातापीता उभे आहेत. राऊतांना घेवून जाताना कार्यकर्ते बेभान होणारच. पण हे बेभान नव्हे तर हे शिवसेनेचे प्रेम आहे”, असं सुनील राऊत म्हणाले. “माझी आई आणि मुली दोन्ही होते. संजय राऊत आमचे कुटुंबप्रमुख आहेत. आम्ही कुठेही डगमगणार नाहीत. माझ्या आईचं वय 84 आहे. आईसुद्धा डगमगणार नाही. उद्धव ठाकरे आमच्या सातत्याने संपर्कात आहेत. ते सुद्धा डगमगणार नाहीत. ही राजकीय हेतूने, सूडबुद्धीने कारवाई आहे”, असा दावा सुनील राऊतांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या