JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यात पुन्हा रंगणार तमाशा फड; सादरीकरणाला परवानगी, सुरेखा पुणेकरांनी मानले राज्य सरकारचे आभार

राज्यात पुन्हा रंगणार तमाशा फड; सादरीकरणाला परवानगी, सुरेखा पुणेकरांनी मानले राज्य सरकारचे आभार

लावणी सम्राञी सुरेखा पुणेकर यांनी आपला एक व्हिडिओ (Surekha Punekar Video) शेअर करत तमाशा कलावंतना 1 कोटींची मदत केल्याबद्दल आणि 1 फेब्रुवारीपासून तमाशा सादरीकरणाला परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचे आणि राष्ट्रवादीचे जाहीर आभार मानले आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 25 जानेवारी : कोरोना महामारी (Coronavirus) आणि त्यामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन (Lockdown) तसंच अनेक गोष्टींसाठी निर्बंध घालण्यात आल्याने याचा मोठा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे तमाशा कलावंतही अडचणीत आले होते. मात्र, आता या कलावंताना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात 1 फेब्रुवारीपासून तमाशा सादरीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.

Pune guidelines: पुण्यातील शाळा बंद तर स्विमिंग पूल सुरू, पाहा नवी नियमावली

लावणी सम्राञी सुरेखा पुणेकर यांनी आपला एक व्हिडिओ (Surekha Punekar Video) शेअर करत तमाशा कलावंतना 1 कोटींची मदत केल्याबद्दल आणि 1 फेब्रुवारीपासून तमाशा सादरीकरणाला परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचे आणि राष्ट्रवादीचे जाहीर आभार मानले आहेत. या निर्णयामुळे कलाकारांना दिलासा मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

सुरेखा पुणेकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कलाकारांच्या व्यथाही मांडल्या आहेत.

पुण्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी नागरिकांना दिलं जात होतं आधार कार्ड

सुरेखा पुणेकर आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या, की गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे कार्यक्रम बंद असल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात आता राज्य सरकारने तमाशा सादरीकरणाला १ फेब्रुवारीपासून परवानगी दिली आहे. त्यामुळे, यात्रांमध्ये लावणी तसंच तमाशाचं आयोजन करा आणि कलावंतांचे कार्यक्रम ठेवा, तसंच त्यांना सहकार्य करा, असं आवाहन सुरेखा पुणेकर यांनी नागरिकांना केलं आहे. यासोबतच त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचेही आभार मानले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या